मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, प्रीपेड प्लॅन्सचे दर महागले, जाणून घ्या तुमच्या प्लॅनचा नवा दर

एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, प्रीपेड प्लॅन्सचे दर महागले, जाणून घ्या तुमच्या प्लॅनचा नवा दर

एअरटेलच्या (Airtel) 79 रुपयांच्या प्लॅनच्या किमतीत 20 रुपयांची वाढ झाली आहे. आता हा प्लॅन 99 रुपयांचा असेल. कंपनी या प्लॅनमध्ये 99 मिनिटांचा टॉकटाइम (Talk time) आणि 200 MB डेटा (Data) देणार आहे.

एअरटेलच्या (Airtel) 79 रुपयांच्या प्लॅनच्या किमतीत 20 रुपयांची वाढ झाली आहे. आता हा प्लॅन 99 रुपयांचा असेल. कंपनी या प्लॅनमध्ये 99 मिनिटांचा टॉकटाइम (Talk time) आणि 200 MB डेटा (Data) देणार आहे.

एअरटेलच्या (Airtel) 79 रुपयांच्या प्लॅनच्या किमतीत 20 रुपयांची वाढ झाली आहे. आता हा प्लॅन 99 रुपयांचा असेल. कंपनी या प्लॅनमध्ये 99 मिनिटांचा टॉकटाइम (Talk time) आणि 200 MB डेटा (Data) देणार आहे.

    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या भारती एअरटेल (एअरटेल) कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. भारती एअरटेलने (Bharti Airtel) प्रीपेड (Prepaid) दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर 2021 पासून नवे दर लागू होणार आहेत. प्लॅन्सच्या (Plans) किंमती वाढवून कंपनी प्रतियुजर सरासरी 200 रुपये कमाईचं लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करत आहे. प्रीपेड प्लॅनचे दर वाढल्याने ग्राहकांना त्याची झळ बसणार आहे. दरवाढीनंतर आता कंपनीच्या बेस प्लॅनची (Base Plan) किंमत 79 रुपयांवरून 99 रुपये अशी झाली आहे. 26 नोव्हेंबरपासून नव्या दरानुसार प्रीपेड पॅक www.airtel.in वर उपलब्ध होणार आहेत. एंट्री लेव्हल व्हॉइस प्लॅनच्या दरांत 25 टक्के वाढ झाली आहे, तर अमर्यादित व्हॉइस बंडलसाठी ही वाढ सुमारे 20 टक्के आहे. एअरटेल कंपनीने प्रीपेड प्लॅन्सच्या दरात वाढ करून ग्राहकांना एक प्रकारे झटका दिला आहे.

    एअरटेलच्या (Airtel) 79 रुपयांच्या प्लॅनच्या किमतीत 20 रुपयांची वाढ झाली आहे. आता हा प्लॅन 99 रुपयांचा असेल. कंपनी या प्लॅनमध्ये 99 मिनिटांचा टॉकटाइम (Talk time) आणि 200 MB डेटा (Data) देणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी 1 पैसा प्रति सेकंद चार्ज कंपनीकडून घेतला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी (Validity) 28 दिवसांची असेल.

    हेही वाचा : मणक्याच्या आजाराने त्रस्त उद्धव ठाकरेंवर Spine Surgery; जाणून घ्या लेटेस्ट हेल्थ अपडेट

    149 रुपयांचा प्लॅनही महागला

    एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लॅन आता महागला असून, त्याची किंमत 179 रुपये झाली आहे. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना देशातल्या कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड ट्रू कॉलिंग (Unlimited True Calling) सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस फ्री मिळतात. तसंच ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो.

    हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई हायकोर्टात युक्तीवाद, तोडगा निघाला का?

    219 रुपये नव्हे, तर आता मोजावी लागणार इतकी किंमत

    एअरटेलच्या 219 रुपयांच्या प्लॅनचा दरही आता वाढला असून, त्याची किंमत 265 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. तसंच दररोज 100 एसएमएस फ्री मिळतात. इंटरनेटसाठी 1GB डेटा ग्राहकांना दिला जातो. याशिवाय 249 रुपयांचा प्लॅन आता 299 रुपयांना असेल. 379 रुपयांचा प्लॅनदेखील महागला असून, तो आता 455 रुपयांना असेल. 598 रुपयांचा प्लॅन 719 रुपयांना, 1498 रुपयांचा प्लॅन 1799 रुपयांना असेल. 2498 रुपयांचा प्लॅनही महागला असून, त्यासाठी ग्राहकांना आता 2999 रुपये मोजावे लागणार आहेत.

    First published:
    top videos