कोरोना लशीकरणात होणार मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर, PM मोदींनीही केलं कौतुक
कोरोना लशीकरणात होणार मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर, PM मोदींनीही केलं कौतुक
समाजातील वंचितांपर्यंत कोरोनाची मदत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप फायदा झाला. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेत आपण मोबाईल तंत्रज्ञानाचा उपयोग करणार असल्याचंही मोदी म्हणाले
नवी दिल्ली, 9 डिसेंबर : जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीतून सुटका होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जवळजवळ वर्षभर चाललेल्या या महामारीवर लस उपलब्ध होण्याची शक्यता आता वाढली आहे. ब्रिटनमध्ये मंगळवारी पहिली लस देण्यात आली. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मंगळवारी महामारीच्या काळात मोबाईल तंत्रज्ञानाचा (Mobile Technology) बराच उपयोग झाला अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं. लसीकरणातही (Covid-19 Vaccination) त्याचा वापर करता येईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
तीन दिवस चालणाऱ्या मोबाइल इंडिया काँग्रेस या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांचा लाभ त्याच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात मोबाईल तंत्राज्ञानाचा खूप फायदा झाला आहे. समाजातील वंचितांपर्यंत कोरोनाची मदत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप फायदा झाला. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेत आपण मोबाईल तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहोत.
लसीकरणाला लवकरच सुरुवात -
कोविडवरील लशीचा आपतकालीन वापर करण्याची परवानगी फायझर, अस्ट्राझेनेका आणि भारत बायोटेक या तीन कंपन्यांनी भारत सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे देशात लवकरच मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या 95 लाखांहून अधिक असून त्यापैकी 91 लाखांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत.
मोदींनी केलं मोबाइल तंत्रज्ञानाचं कौतुक -
उद्घाटनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, ‘दूरसंचार क्षेत्रात वेळेवर 5G तंत्रज्ञानाचा वापर सुरू करून काम करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात कोट्यवधी भारतीयांना त्याचा फायदा होऊ शकेल. भारताला टेलिकम्युनिकेशन उपकरणं, डिझायनिंग, संशोधन व उत्पादन या क्षेत्राचं मोठं केंद्र म्हणून पुढे यायला हवं. कोट्यवधी डॉलरची मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात मोबाइल तंत्रज्ञानाचाच मोठा वाटा आहे.’
‘कोणत्याही रोख रकमेच्या देवाण-घेवाणीशिवाय आर्थिक व्यवहार करणं हे मोबाइल तंत्रज्ञानामुळेच शक्य झालं आहे. त्यामुळे यंत्रणेतील पारदर्शकता वाढली आहे. या मोबाईल तंत्रज्ञानामुळे आता टोलनाक्यांवर वाहनांची संपर्कविरहित वाहतूक शक्य होईल.’असंही पंतप्रधान म्हणाले. मोबाइल दूरसंचार सेवा कंपन्यांची संघटना सीओओईद्वारा, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं होतं.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.