नवी दिल्ली, 9 डिसेंबर : सरकार आणि कॉर्पोरेट सिस्टमची देखरेख करणारी सायबर सिक्योरिटी फर्मच (cyber security) हॅक करण्यात आली आहे. सायबर सिक्योरिटी फर्म FireEye हॅक (hacking) करण्यात आली आहे. कंपनीने मंगळवारी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. FireEye कंपनीकडून, ग्राहकांच्या सिक्योरिटी चेकसाठी वापरण्यात येणाऱ्या असेसमेंट टूलला टार्गेट करून अटॅकर्सने चोरी केल्याचं, कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
FireEye चे सीईओ केविन मँडिया (Kevin Mandia) यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलंय की, हा सायबर हल्ला आम्ही वर्षभर पाहिलेल्या हजारो घटनांपेक्षा अतिशय भिन्न आहे. हॅकर्सनी विशेषत: FireEye ला टार्गेट करत, अटॅक करण्यासाठी त्यांच्या जागतिक स्तरावरील क्षमतांचा वापर केला आहे.
त्यांना ऑपरेशनल सिक्योरिटी आणि शिस्तीचं विशेष प्रशिक्षण दिलं जात, खास लक्ष ठेवलं जातं. त्यांनी गुप्तरित्या सुरक्षा उपकरणांचा आणि फॉरेन्सिक परीक्षेचा सामना करणाऱ्या पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. हॅकर्सनी अशा कॉम्बिनेशनचा वापर केला आहे, जो आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी कधीही पहिला नाही, असं सीईओ केविन मँडिया यांनी म्हटलंय.
सायबर अटॅकर्सनी FireEye च्या ‘Red Team’द्वारा वापरण्यात येणाऱ्या टूल्स यशस्वीपणे मिळवल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एका प्रसिद्ध सायबर सिक्योरिटी फर्मवरच हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे.
हॅकर्सनी चोरी केलेल्या टूल्सचा, इतरत्र वापर केलाचा कोणताही पुरावा नसल्याचं FireEye चे म्हटलं आहे. परंतु कंपनीने 300 ‘countermeasures’ (उपाय) पब्लिश केले आहेत, ज्याद्वारे ग्राहक आणि इतर लोक आपलं संरक्षण करण्यास सक्षम असतील. तसंच FBI, Microsoft सारख्या अनेक कंपन्यांसह या हॅकिंगचा तपास करत असल्याचंही कंपनीने म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime