जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Cheapest car in India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3 लाखांपेक्षा कमी

Cheapest car in India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3 लाखांपेक्षा कमी

Cheapest car in India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3 लाखांपेक्षा कमी

Cheapest car in India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3 लाखांपेक्षा कमी

Cheapest car in India: कमी बजेटमध्ये कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कार कंपन्यांनी सध्या स्वस्तात छोट्या कार बाजारात ठेवल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑगस्ट: कार घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. अलीकडच्या काळात भारतामध्ये कार खरेदी करू पाहणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. वाहन बाजारात SUV आणि लक्झरी कार विभागात सतत नवनवीन कार लॉन्च होत आहेत, पण तरीही लहान कार विभागाची मागणीदेखील कायम आहे. कमी बजेटमध्ये (Cheapest car in India) आपली कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कार कंपन्यांनी सध्या स्वस्तात छोट्या कार बाजारात उपलब्ध केल्या आहेत. अशा परिस्थितीत कमी बजेट असलेले लोक या छोट्या कारकडे वळू शकतात. 3 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत नवीन कार देखील खरेदी केली जाऊ शकते. या बजेटमध्ये मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि डॅटसन ब्रँड्सचे 3 मॉडेल्स उपलब्ध आहेत. 1. Datsun redi-GO- Datsun ची redi-GO BS6 ही कार परवडणाऱ्या किंमतीमध्यो लोकांना विकत घेता येऊ शकते. या कारची एक्स शोरूम (दिल्ली) किमत 2.83 लाख रुपयांपासून ते 4.77 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमती नॉन मेटॅलिक कलर्ससाठी आहेत. मेटॅलिक रंगांसाठी ग्राहकाला आणखी 3000 रुपये द्यावे लागतील. Datsun redi-GO BS6 मध्ये दोन इंजिन पर्याय आहेत. कारचं 800cc इंजिन 53hp पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील आहे. या कारचं 1.0 लिटर इंजिन 66hp आणि 91Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT ट्रान्समिशन उपलब्ध असेल. कार 1.0 लिटर इंजिनमध्ये AMT ट्रान्समिशनसह 22kmpl आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह 21.7kmpl मायलेज देते. त्याच वेळी, 800cc इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मायलेज 20.71kmpl आहे. सुरक्षितता वैशिष्ट्यांमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, EBD सह ABS, पार्किंग सेन्सर्स, समोरच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर यांचा समावेश आहे. टॉप व्हेरियंटमध्ये पॅसेंजर एअरबॅगही देण्यात आली आहे. Datsun redi-GO BS6 फ्रंटल, ऑफसेट आणि पादचारी संरक्षण नियमांचे पालन करते, असा दावा कंपनीनं केला आहे. 2. रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)- Renault Kwid ची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 2,92,290 रुपयांपासून सुरू होते. 3 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या Kwid मध्ये 799cc 3 सिलेंडर BS6 इंजिन आहे. हे इंजिन 54 PS पॉवर आणि 72 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर, ड्रायव्हर एअरबॅग, ABS+EBD, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, ओव्हरस्पीड अलर्ट, रिअर इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर सीट बेल्ट, रिअर डोअर चाइल्ड लॉक यांचा समावेश आहे. 3. मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)- अल्टोची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 2,94,800 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला याचे पेट्रोल व्हेरिएंट 3 लाख रुपयांच्या आत मिळेल. Alto चे 796cc 12 वॉल्व्ह, 3 सिलेंडर BS6 पेट्रोल इंजिन 35.3 KW पॉवर आणि 69 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. अल्टोच्या पेट्रोल व्हर्जनचे मायलेज 22.05 kmpl आहे. अल्टोमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हरसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, ABS+EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, इमोबिलायझर, रिअर डोअर चाइल्ड लॉक यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car
  • First Published :
जाहिरात
जाहिरात