मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता डेस्कटॉपवरही गुगल युझर्सना वापरता येणार ‘डार्क मोड’, जाणून घ्या पद्धत

आता डेस्कटॉपवरही गुगल युझर्सना वापरता येणार ‘डार्क मोड’, जाणून घ्या पद्धत

 गेल्या वर्षी गुगलनं मोबाइल युझर्ससाठी गुगल सर्चसाठीचे डार्क मोड (Dark Mode) हे फिचर दाखल केलं होतं.

गेल्या वर्षी गुगलनं मोबाइल युझर्ससाठी गुगल सर्चसाठीचे डार्क मोड (Dark Mode) हे फिचर दाखल केलं होतं.

गेल्या वर्षी गुगलनं मोबाइल युझर्ससाठी गुगल सर्चसाठीचे डार्क मोड (Dark Mode) हे फिचर दाखल केलं होतं.

मुंबई, 14 सप्टेंबर : आपल्याला कधीही कोणतीही माहिती हवी असली तर पट्कन एकच नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे गुगल सर्च (Google Search). एका क्लिकवर आपण हवी ती माहिती शोधू शकतो. आजकाल मोबाईलचा (Mobile) वापर प्रचंड वाढल्यानं गुगल सर्चचा वापर मोबाइलवर वाढला असला तरी, डेस्कटॉप (Desktop), लॅपटॉपवर (Laptop) काम करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं तिथंही गुगल सर्चचा वापर प्रचंड आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सप्रमाणे गुगलही आपल्या युझर्ससाठी (Users) विविध फीचर्स (Features) आणत असते. युझर्सचा अनुभव सुधारण्यासाठी नेहमीच नवनवीन पर्यायांची चाचणी करत असल्याचं गुगलनं अलीकडेच ‘द व्हर्ज’शी बोलताना स्पष्ट केलं होतं.

गुगलच्या या धोरणानुसार, गेल्या वर्षी गुगलनं मोबाइल युझर्ससाठी गुगल सर्चसाठीचे डार्क मोड (Dark Mode) हे फिचर दाखल केलं होतं. आता हे फिचर डेस्कटॉपवरही उपलब्ध झालं आहे.

रस्त्यावरील खांबाला हात लावताच 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका;घटनेचा Live Video

टीव्ही9 हिंदीनं दिलेल्या वृत्तानुसार, गुगलनं अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) अॅप्ससाठी हे डार्क मोड फिचर मे 2020मध्ये दाखल केलं होतं. त्याचवेळी डेस्कटॉप युझर्ससाठी ते उपलब्ध करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. गुगलने फेब्रुवारी महिन्यात सर्च डेस्कटॉपवर डार्क मोडची चाचणी सुरू केली होती. गुगलचे प्रॉडक्ट सपोर्ट व्यवस्थापक हंग एफ (Hung F) यांनी आजपासून (13 सप्टेंबर 21) हे फिचर डेस्कटॉपवर उपलब्ध होत असल्याची घोषणा केली. पुढील काही आठवड्यात हे फिचर पूर्णपणे कार्यान्वित होईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यामुळे आता डेस्कटॉपवर गुगल सर्च या ब्राउझिंग इंजिनवरून सर्च करणाऱ्या युझर्सना ब्राईट वेबपेजेसचा (Web Pages) रंग करडा (Grey) करता येईल. यामुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

हे डार्क मोड फिचर आपल्या डेस्कटॉपवर कार्यान्वित करण्यासाठी खालील टप्प्यात प्रक्रिया करणं आवश्यक आहे.

- सर्वांत प्रथम वेब पेजच्यावर उजवीकडे जाऊन सेटिंग्जवर क्लिक करा.

- नंतर डावीकडील Appearance वर क्लिक करा.

- यानंतर डिफॉल्टमध्ये (Default) डिव्हाइस निवडा. त्यानंतर डार्क किंवा लाईट यापैकी ऑप्शन निवडा.

- डिव्हाइस डिफॉल्ट निवडल्यानंतर आपोआप डिव्हाइसवरील कलरशी पेजवरील कलर जुळतो.

- डार्क रंग निवडतो तेव्हा आपल्याला डार्क पार्श्वभूमीवर एक लाईट टेक्स्ट दिसेल.

- लाईट कलर निवडल्यावर मजकूर डार्क रंगात दिसेल.

सेटिंग्ज आपल्या आवडीनुसार बदलल्यानंतर, सेव्ह बटणावर क्लिक करा. गुगल होमपेज, सर्च रिझल्ट पेज, सर्च सेटिंग्ज आणि इतर गोष्टीमध्येही याचा वापर करता येईल. या नव्या फिचरमुळे डेस्कटॉपवर गुगल सर्च वापरणाऱ्या युझर्सना वेबपेज पाहताना ब्राईट कलरमुळे होणारा त्रास कमी करता येणार आहे. टेक्स्ट वाचणे सुखद होणार आहे.

First published: