मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Mi Anniversary Sale: खुपच स्वस्त मिळतोय Xiaomi चा नवा स्मार्टफोन

Mi Anniversary Sale: खुपच स्वस्त मिळतोय Xiaomi चा नवा स्मार्टफोन

या सेलमध्ये रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन खरेदी करताना SBI कार्ड वापरल्यास 10 टक्के डिस्काउंट (Discount) दिला जाणार आहे.

या सेलमध्ये रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन खरेदी करताना SBI कार्ड वापरल्यास 10 टक्के डिस्काउंट (Discount) दिला जाणार आहे.

या सेलमध्ये रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन खरेदी करताना SBI कार्ड वापरल्यास 10 टक्के डिस्काउंट (Discount) दिला जाणार आहे.

मुंबई 13 जुलैMi अ‍ॅनिव्हर्सरी सेलचा आज (13 जुलै 2021) दुसरा दिवस आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स आणि ऑफर्स (Offers) दिल्या जात आहेत. या सेलमध्ये काही डील्स अशीही आहेत, की ज्यात मुख्य उत्पादनासोबत शिओमीचं (Xiaomi) प्रॉडक्ट मोफत दिलं जात आहे.

रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note Pro Max) या स्मार्टफोनच्या (Smartphone) 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. याच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 19,999 रुपये असून, 8 जीबी रॅम आणि128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची कीमत 21,999 रुपये आहे.

Mi.Com वरून मिळालेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन खरेदी करताना SBI कार्ड वापरल्यास 10 टक्के डिस्काउंट (Discount) दिला जाणार आहे. हा डिस्काउंट जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत असेल. याशिवाय उत्तम ऑफर म्हणजे ग्राहकांना फोनसोबत रेडमी इयरबड्स 2 C (Redmi Earbuds 2 C) मोफत दिले जाणार आहेत.

20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट स्मार्टफोन्स; जुलै महिन्यात खरेदीची सुवर्णसंधी

या फोनला 6.67 इंची फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यावर HDR कंटेंट खूप चांगला दिसतो. याचा डिस्प्ले इतका छान आहे, की अगदी उन्हातही स्क्रीनवर काही वाचण्यात अडचण येत नाही. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G हा प्रोसेसर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये फोन में 108 मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप (Quad Camera Setup) देण्यात आला आहे. या फोनच्या मुख्य कॅमेऱ्यातून चांगला फोटो येतो. त्याचा नाइट मोड परफॉर्मन्सही खूप चांगला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेन्सरही (Ultra Wide Sensor) देण्यात आला आहे. तसंच, फोनमध्ये पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.

जुना फोन Factory Reset कसा करायचा? या सोप्या टिप्स करा फॉलो

या फोनमध्ये 5,020 mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी (Powerful Battery) देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी एकद दिवस अगदी सहजपणे पुरते. यात 33W फास्ट चार्जिंगची (Fast Charging) सुविधाही देण्यात आली आहे. फोनसोबतच चार्जरही मिळतो. चार्जिंगसाठी USB Type-C port देण्यात आला आहे. फोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एक तास लागतो.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphones, Xiaomi