जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट स्मार्टफोन्स; जुलै महिन्यात खरेदीची सुवर्णसंधी

20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट स्मार्टफोन्स; जुलै महिन्यात खरेदीची सुवर्णसंधी

20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट स्मार्टफोन्स; जुलै महिन्यात खरेदीची सुवर्णसंधी

20 हजार रुपये किमतीच्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    सध्याच्या काळात स्मार्टफोनशिवाय (Smartphone) जगण्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. त्यातही तरुण पिढी तर नाहीच नाही. त्यामुळं दिवसेंदिवस स्मार्टफोन बाजारपेठही वाढत आहे. स्मार्टफोन उत्पादक कंपन्या कमी किमतीत जास्तीत जास्त फिचर्स असणारे स्मार्टफोन (Latest Smartphones) दाखल करून जास्तीत जास्त ग्राहक वर्ग काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत उत्तम स्मार्टफोन (Budget Smartphones) घेण्याची संधी मिळत आहे. बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध असल्यानं योग्य पर्याय निवडणे ग्राहकांना कठीण होते. यासाठी आम्ही तुमची मदत करणार आहोत. योग्य स्मार्टफोन निवडण्यासाठी 20 हजार रुपये किमतीच्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. त्या आधारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार योग्य स्मार्टफोनची निवड करू शकता. 1) पोको एक्स3 प्रो (Poco x3 Pro) चिनी कंपनीच्या या पोको एक्स3 प्रो स्मार्टफोनची (Poco x3 Pro) किंमत भारतात 18,999 रुपये असून हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 6.67 इंच एफएचडी + डिस्प्लेसह आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी चिपसेट असलेल्या या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. यात 6000 एमएएचची बॅटरी असून 33 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून, क्वाड रियर कॅमेरा सेट अप आहे. 2) आयक्यू झेड3(iQoo Z3)  आयक्यू झेड3(iQooZ3) या 5जी स्मार्टफोनची किंमत 19,990 रुपये आहे. यात 6.58 इंच एफएचडी + डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768 जी चिपसेट असून यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतचे इंटर्नल स्टोअरेज आहे. आयक्यू झेड3 5जी मध्ये 4400 एमएएच बॅटरी असून 55 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हे वाचा - किती वेळा Password बदलणं योग्य? Google च्या सुंदर पिचईंनीच सांगितलं 3) रेडमी नोट 10 प्रो मॅक्स(Redmi Note 10 Pro Max)  शाओमीचा रेडमी नोट 10 प्रो मॅक्सची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले असून, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी चिपसेट देण्यात आली आहे. 8 जीबी पर्यंतची रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. यामध्ये 5020 एमएएचची बॅटरी असून, 33 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये तब्बल 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. 4) रिअलमी नार्झो 30 प्रो(Realme Narzo 30 Pro) भारतात हा स्मार्टफोन 15,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यात 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा एफएचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोअरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. 5) सॅमसंग गॅलेक्सी एफ 62(Samsung Galaxy F62) सॅमसंग गॅलेक्सी एफ 62ची भारतातील किंमत 19,999 रुपये आहे. 6.6 इंचाच्या सुपर अमोलेड + डिस्प्ले आहे. यात सॅमसंगचा एक्सिनोस 9825 एसओसी प्रोसेसर असून, यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे ते 1 टीबीपर्यंत वाढवता येते. याची बॅटरी मोठी असून ती तब्बल 7000 एमएएच क्षमतेची आहे. क्वाड रिअर कॅमेरा असून, 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हे वाचा - SBI, PNB सह या 6 बँकांमध्ये आहे जनधन अकाउंट, तर असा चेक करा बॅलन्स 6) रिअलमी 8 प्रो (Realme 8 Pro) रिअलमी 8 प्रो स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपये आहे. 6.4 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720 जी चिपसेट देण्यात आली आहे. 8 जीबी रॅम आणि 128जीबी पर्यंत इंटर्नल स्टोअरेज आहे. यात 4500 एमएएचची बॅटरी असून 65 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. क्वाड रिअर कॅमेरा सेटअप असून, 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. 7) पोको एक्स3(Poco X3) पोको एक्स3 हा स्मार्टफोन 16,999 रुपये किमतीत उपलब्ध आहे. यात 6.67 इंच एफएचडी + डिस्प्ले असून, त्याचा रीफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी चिपसेट असून 8 जीबी रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 6000 एमएएचची बॅटरी असून तिला 33 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यात 64 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा आहे. 8) सॅमसंग गॅलेक्सी M31s(Samsung Galaxy M31S) सॅमसंग गॅलेक्सी एम 31एस या स्मार्टफोनची किंमत 19,499 रुपये आहे. यात एफएचडी प्लस रिझोल्युशनचा 6.5 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सीनॉस 9611 चिपसेट असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. 25 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 एमएएचची बॅटरी आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरासहा क्वाड रीअर कॅमेरा सेटअप आहे. हे वाचा - Success Story: देशातील सर्वात मोठा IPO आणणारी कंपनी Paytm ची यशोगाथा 9) रिअलमी एक्स 7(Realme X7) 18,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडचा स्मार्टफोन आहे. 6.4 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्लेसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800 यू चिपसेट आहे. 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोअरेज आहे. यात 64 मेगापिक्सलच्या कॅमेरासह ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. 65 वॅट फास्ट चार्जिंगसह 4310 एमएएचची बॅटरी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात