• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Whatsapp वर 'Last Seen' बद्दल नवीन अपडेट; अनेकांचं टेन्शन कमी होणार

Whatsapp वर 'Last Seen' बद्दल नवीन अपडेट; अनेकांचं टेन्शन कमी होणार

नवीन अपडेटमध्ये, व्हॉट्सअॅप एक नवीन प्रायव्हसी ऑप्शन (Whatsapp Privacy Option) आणण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे यूजर्स त्यांचे Last Seen कोण पाहू शकतात आणि कोण पाहू शकत नाहीत हे ठरवू शकतील.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर : WhatsApp लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स (Whatsapp Features) घेऊन येत असतो. या अॅपची सर्व फीचर्स यूजर्ससाठी खूप उपयुक्त आहेत. परंतु त्याचे 'Last Seen' फीचर कधीकधी लोकांसाठी समस्या निर्माण करते. विशेषतः जेव्हा तुम्हाला कोणाला मेसेज पाठवायचा नसतो. अॅपमध्ये ब्लू टिक आणि लास्ट सीन बंद किंवा चालू करण्याचा पर्याय आहे, परंतु तो खूपच लिमिटेड आहे. आता नवीन अपडेटमध्ये, व्हॉट्सअॅप एक नवीन प्रायव्हसी ऑप्शन (Whatsapp Privacy Option) आणण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे यूजर्स त्यांचे Last Seen कोण पाहू शकतात आणि कोण पाहू शकत नाहीत हे ठरवू शकतील. याचा अर्थ यूजर्स त्यांचे Last Seen काही लोकांपासून लपवू शकतात. हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये आढळून आले आहे. Last Seen हे एक अतिशय उपयुक्त फीचर आहे, जे यूजर कधी शेवटचा ऑनलाईन होता हे दर्शवते. तुम्ही ऑनलाइन असतानाही एखाद्याला तुम्ही रिप्लाय देऊ नये असे वाटत नाही. त्यामुळे तिथे गैरसमज निर्माण होतात. WABetaInfo ने या नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे तसेच एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये हे फीचर अँड्रॉईड अॅपवर कसे दिसेल हे पाहिले जाऊ शकते.

  अतिशय स्वस्तात मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा काय आहे ऑफर

  सध्या, जर यूजर्सना त्यांचे Last Seen लपवायचे असेल तर त्यांना सेटिंगमध्ये जावे लागेल, त्यानंतर अकाउंटमध्ये जावे लागेल. तिथून प्रायव्हसीमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर येथे Last Seen चा पर्याय उपलब्ध आहे.

  Smartphone पाण्यात पडल्यास अशी घ्या काळजी, अजिबात करु नका या गोष्टी

  अॅप Privacy मध्ये मिळेल चौथा पर्याय येथे यूजर्सना Everyone, My Contacts आणि Nobody असे तीन पर्याय दिसतात. नवीन अपडेटनंतर यूजर्सना 'My Contact Except…' देखील मिळेल. व्हॉट्सअॅपमधील हा चौथा पर्याय युजर्सना निवडलेल्या कॉन्टॅक्टपासून Last Seen लपवण्याची परवानगी देईल. प्रोफाइल फोटोंबद्दल जसं About सेट करता येतं तसाच हा पर्याय आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: