मुंबई, 11 ऑक्टोबर : पोळी/चपाती लाटणे हे सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरातील सर्वात कठीण काम मानले जाते. साहजिकच गोल परफेक्ट पोळ्या बनवणे प्रत्येकाला शक्य नसते. पोळ्या लाटण्यासाठी सहसा फक्त पोळपाट-लाटणं वापरलं जातं. मात्र, अनेकांना कदाचित माहीत नसेल की, पोळपाट-लाटण्याचा वापर फक्त पोळ्या लाटण्यापुरता मर्यादित नाही. पोळपाट-लाटण्याच्या मदतीने आपण अनेक कामे सोपी करू शकतो. बहुतेक घरांमध्ये पोळपाट-लाटणं फक्त पोळ्या/चपाती बनवण्यासाठी वापरलं जातं, तेवढं एकच काम झाल्यानंतर या दोन वस्तू स्वयंपाकघरात बाजूला पडून राहतात. मात्र, आज आपण पोळपाट-लाटणं इतर कामांसाठी कसं वापरायचं ते जाणून घेऊया. मसाला बारीक करा - सर्वसाधारणपणे लोक स्वयंपाकघरात मसाले किंवा इतर गोष्टी बारीक करण्यासाठी खलबत्ता किंवा पाठा वापरतात. मात्र, कमी प्रमाणात वस्तू बारीक करायच्या असतील तर त्याचा उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत, आपण लहान प्रमाणात वस्तू क्रश करण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी पोळपाट-लाटण्याची मदत घेऊ शकता. यामुळे छोट्याशा कामासाठी तुमचा खलबत्ता घाण होणार नाही आणि तुमचे कामही चुटकीसरशी पूर्ण होईल. चॉपिंग बोर्ड म्हणून वापरा - अनेक वेळा हातात धरून भाजी कापताना हात कापण्याची भीती असते. ज्यामुळे तुम्ही पोळपाटाचा वापर चॉपिंग बोर्ड म्हणून करू शकता. भाजीपाला पोळपाटावर ठेवून कापून घेतल्यास तुमची भाजीही लवकर कापली जाईल आणि हात कापण्याचा धोकाही कमी होईल. हे वाचा - वेट लॉस डाएटमध्ये सामील करा ग्लूटेन फ्री धान्य, पोटभर खाऊनही वजन राहील नियंत्रित भाजलेले जिरे बारीक करण्यासाठी उपयुक्त - पोळपाट-लाटण्याच्या मदतीने तुम्ही रोजच्या कामात वापरण्यात येणारे मसाले सहज बारीक करू शकता. खडे मसाल्यापासून ते भाजलेल्या जिर्यापर्यंत छोट्या-छोट्या वस्तू सहजपणे बारीक केल्या जाऊ शकतात. त्यासाठी पोळपाटावर मसाले टाकून लाटण्याने बारीक करून घ्या. याने कमी वेळात तुमचे मसाले उत्तम प्रकारे बारीक होतील.
शेप देण्याचे काम - चपाती/पोळी व्यतिरिक्त इतर गोष्टींना आकार देण्यासाठी आपण पोळपाट-लाटणं वापरू शकता. पोळपाट-लाटणं वापरून पापड आणि कुकीजला योग्य आकार देऊ शकता. त्याचबरोबर ब्रेड रोल आणि पुरी बनवण्यासाठी पोळपाट-लाटणं वापरू वापर खूप उपयुक्त ठरू शकतो.