मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : पोटभर खाऊनही वजन राहिल नियंत्रित; आहारात करा 5 धान्यांचा समावेश

Weight Loss Tips : पोटभर खाऊनही वजन राहिल नियंत्रित; आहारात करा 5 धान्यांचा समावेश

आपण जे अन्न खातो ते वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाण्यास आणि आहारात काही बदल करण्यास सांगतात.

आपण जे अन्न खातो ते वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाण्यास आणि आहारात काही बदल करण्यास सांगतात.

आपण जे अन्न खातो ते वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाण्यास आणि आहारात काही बदल करण्यास सांगतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 ऑक्टोबर : हल्ली लोक आपल्या आरोग्याविषयी आणि वाढत्या वजनाविषयी खूप जागरूक झाले आहेत. जास्तीचे वजन कमी करण्यासाठी लोक आपल्या आहारात अनेक बदल करत असतात. आपण जे अन्न खातो ते वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाण्यास आणि आहारात काही बदल करण्यास सांगतात. त्यामुळे शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण होण्यास मदत होते. तसेच तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.

वजन कमी करण्यासाठी असेच एका प्रकारचे पदार्थ खूप उपयुक्त असतात. ते म्हणजे ग्लूटेन फ्री धान्य. जसे की ज्वारी. ज्वारी हे एक उत्कृष्ट ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. केवळ ज्वारीच नाही तर ज्वारीप्रमाणे आणखी काही धान्य आहे, जी ग्लूटेन फ्री आहेत आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. पाहुयात ही कोणती धान्य आहेत.

फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे चुकीचे

बाजरी

बाजरी हे धान्य पचायला सोपे असते. त्यामुळे याची ऍलर्जी शक्यतो होत नाही. बाजरी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. त्याचबरोबर यामध्ये फायबरदेखील जास्त असते. बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि यामध्ये प्रोटिन्सही भरपूर प्रमाणात असतात.

क्विनोआ

क्विनोआ हे एक सीड आहे. क्विनोआला सुपरफूड मानले जाते. कारण त्यात भरपूर प्रोटीन, आहारातील फायबर, व्हिटॅमिन बी आणि लोह, जस्त आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. हे पूर्णपणे ग्लूटेन-मुक्त देखील आहे.

ब्राऊन राईस

तुम्हाला गव्हाची ऍलर्जी असल्यास तांदूळ तुमच्यासाठी उत्तम पदार्थ ठरतो. त्यातही तपकिरी तांदूळ म्हणजेच ब्राऊन राईस जास्त फायदेशीर असतो. तपकिरी तांदूळ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि मिनरल्स यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि यामध्ये पांढऱ्या तांदळाच्या चौपट फायबर आहे. वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस फायदेशीर ठरतो.

बकव्हीट

बकव्हीट एक मॉक सीरिअल आहे. कारण ते खरं तर एक बी आहे. बकव्हीट हे ग्लूटेन फ्री धान्य असल्याने ते वजन कमी करण्यात मदत करते. यात भरपूर फ्लेव्होनॉइड्स आहेत, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आहे. बकव्हीट हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांवर खूप फायदेशीर असते. हे रक्तातील साखरदेखील नियंत्रित करते आणि म्हणूनच मधुमेहासाठी योग्य आहे.

Too Much Exercise Side Effects : तुमची एक चूक आणि तुम्हाला फिट ठेवणारा व्यायामही घेऊ शकतो तुमचा जीव

ओट्स

ओट्स बीटा-ग्लुकन नावाच्या फायबरने समृद्ध असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते t यामुळे ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांवर फायदेशीर ठरते.ओट्समध्ये मॅंगनीज, सेलेनियम, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम आणि जस्त यांसारख्या खनिजे मोठ्या प्रथाबंवर असतात. त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips