Home /News /technology /

रिलायन्स समूहाने सुरू केलं मेड इन इंडिया 'JioBrowser', गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजला देणार टक्कर

रिलायन्स समूहाने सुरू केलं मेड इन इंडिया 'JioBrowser', गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजला देणार टक्कर

रिलायन्स समुहाच्या जिओ प्लॅटफॉर्मकडून (Reliance Jio Platform) आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्मने अँड्रॉइड फोनसाठी जिओ ब्राऊजर (JioBrowser) च्या बिटा व्हर्जनच्या रोल आउटची घोषणा केली आहे.

    मुंबई, 22 सप्टेंबर : रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्मकडून (Reliance Jio Platform) आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्मने अँड्रॉइड फोनसाठी जिओ ब्राऊजर (JioBrowser) च्या बिटा व्हर्जनच्या रोल आउटची घोषणा केली आहे. JioBrowser आता Google Play Store वर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. JioBrowser आता गूगल क्रोम (Google Chrome), मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) आणि ऑपेरा (Opera)च्या यादीमध्ये सामील झाले आहे. जिओ ब्राऊजर मल्टी-प्रोसेस क्रोमियम ब्लिंक इंजिनचा वापर करते आहे. देशामध्ये आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत मेड इन इंडिया अ‍ॅप्सवर अधिक भर दिला जात असताना जिओ ब्राऊजर ग्राहकांच्या भेटीस आले आहे. UC ब्राऊजर भारतात बॅन केल्यानंतर त्याची जागा जिओ ब्राऊजर भरून काढेल अशी प्रतिक्रिया रिलायन्स जिओकडून व्यक्त केली जात आहे. JioBrowser मध्ये महत्त्वाचे फीचर असे आहे की, यामध्ये एक सुरक्षित पिन असलेला प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड आहे. प्रायव्हेट मोडमध्ये ब्राऊज करताना आवश्यक कंटेट बुकमार्क करण्याची क्षमता यामध्ये आहे.  तसेच तुम्ही या अ‍ॅप वापरुन अ‍ॅडव्हान्स डाऊनलोड मॅनेजरच्या मदतीने डाउनलोड देखील करू शकता. यामझ्ये क्विक लिंक्स (Quick Links) देखील आहेत जे युजर्सना त्यांच्या सर्वाधिक व्हिजिट केलेल्या वेबसाइटवर त्वरीत प्रवेश करण्यास परवानगी देतात. (हे वाचा-अरेच्चा! असंही करता येतं का? WhatsApp च्या उपयुक्त अशा 5 टिप्स अँड ट्रिक्स) तुम्ही जिओ ब्राऊजरसह नेहमीच्या इंटरनेट स्पीडपेक्षा वेगवान ब्राऊजिंग करू शकता. या ब्राऊजरच्या फाईलचा आकार फक्त 27 MB आहे. आतापर्यंयत दहा लाखांहून अधिक युजरनी हा ब्राऊजर डाउनलोड केला आहे.  यामध्ये तुम्ही काही स्थानिक भाषांमध्ये देखील ब्राऊज करू शकता. जिओ ब्राऊजरवरून तुम्ही जगभरातील व्हिडीओ आणि फोटो तर पाहूच शकता पण त्याचप्रमाणे क्रिकेटचा लाइव्ह स्कोअर देखील तुम्हाला पाहता येईल. यामध्ये  क्विकशेअर, क्यूआर कोड स्कॅनर, प्रिंट, ऑफलाइन पेज, डेस्कटॉप मोड, मेमरी, बॅटरी सेव्हर, व्हॉइस सर्च, फोर्स झूम, एक्झिट पॉपअप, डार्क थीम असे फीचर देखील आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Reliance

    पुढील बातम्या