वॉशिंग्टन, 11 एप्रिल : जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असतना अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. याकाळात व्हिडिओ कंटेंट पाहाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र यामध्ये जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातही भारतात पॉर्न साइटवर बंदी असतानासुद्धा जगभर पॉर्न पाहणाऱ्या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये भारतात अडल्ट साइटवर जाणाऱ्यांचे ट्राफिक 95 टक्क्यांनी वाढलं आहे.
भारतात मार्चअखेर लॉकडाऊन करण्यात आलं. त्याआधीच पॉर्न कंटेट पाहणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के वाढलं होतं. भारतीय टेलिकॉम ऑपरेटर्सनी अडल्ट साइट ब्लॉक केल्या असल्या तरीही त्यांचा कंटेंट मिरर डोमेनवर पाहता येतो.
जगातील सर्वात मोठी पॉर्नसाइट पॉर्नहबनं साइटच्या ट्राफिकची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार कोरोना व्हायरसच्या संकटातून सुटण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर पॉर्न साइट पाहण्याचं प्रमाण किती वाढलं ते दिसत आहे. या आकडेवारीनुसार फ्रान्समध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर साइटच्या ट्राफिकमध्ये 40 टक्के वाढ झाली. तेच प्रमाण जर्मनीत लॉकडाऊन झाल्यानंतरही आहे. इटलीत लॉकडाऊन झाल्यावर अडल्ट कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झाली.
हे वाचा : 'कोरोना'मुळे विचित्र निर्णय, पॉर्नहब देणार मोफत कंटेट
पहिल्यांदाच अडल्ट साइट्सनी त्यांच्या प्रेक्षकांना फ्री सब्सक्रिप्शन देण्यास सुरुवात केली आहे. याचाही परिणा ट्राफिकवर झाला आहे. रशियात 30 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर रशियातही अडल्ट साइट पाहणाऱ्यांमध्ये 56 टक्के वाढ झाली. याबाबती दक्षिण कोरियात मात्र फारशी वाढ दिसत नाही. तिथं लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली नाही.
हे वाचा : Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का
स्पेनसह युरोपीय देशांमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या तेवढीच आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर स्पेनमध्ये अडल्ट कंटेंट पाहणाऱ्यांचे प्रमाण 60 टक्क्यांनी वाढलं. स्वीत्झर्लंडमध्ये लॉकडाऊननंतर पॉर्न साइटचं ट्राफिक 25 टक्के वाढलं.
हे वाचा : Lockdownमध्ये करिनाला आली बीचची आठवण, शेअर केला Bikini Photo
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus