मुंबई, 03 एप्रिल : कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. लोक घरात असल्यानं त्यांचा बराचसा वेळ स्मार्टफोनवर जातो. यातच मित्र, नातेवाईक, ऑफिसमधले सहकारी यांच्याशी बोलण्यासाठी जास्त वापर होतो. यामुळे व्हॉइस कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. यातही आवाज न येण्याची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. आवाज कट होणं किवा कॉल ड्रॉपचे प्रकार घडत आहेत.
तुम्हालाही कॉलवर आवाज येत नसेल किंवा कॉल ड्रॉप होत असेल तर मोबाइलच्या एका फीचरचा फायदा होऊ शकतो. वायफाय कॉलिंग फीचर तुम्ही ट्राय करू शकता. हे एक असं तत्रज्ञान आहे जे कॉल रिसिव्ह कऱण्यासाठी आणि डाय करण्यासाठी तुमच्या वाय फाय कनेक्शनचा वापर करतं. इथं कॉल तुमच्या फोनवरूनच जातो पण वापर वायफायचा होतो यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्कही द्यावं लागत नाही.
वाय फाय कॉलिंगचे अनेक फायदे आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट आवाज ऐकू शकता. यामध्ये सध्याचा मोबाइलनंबर आणि स्मार्टफोन यांचाच वापर करते. त्याला कोणत्याही अॅपची गरज नाही. कमी नेटवर्क असेल त्याठिकाणीही वाय फाय कॉलिंगचं फीचर उपयोगी पडतं.
तुमच्याकडे हव्यात या गोष्टी
कॉलिंगसाठी वायफाय फीचर वापरण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामध्ये एअरटेल किंवा रिलायन्स जिओचं अॅक्टिव्ह सिम, वाय़ फाय कॉलिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन, वायफाय नेटवर्क कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कॉलिंगसाठी महत्वाचा म्हणजे तुमच्या मोबाइलवर बॅलन्स हवा. तुमचे सिम 4जी आणि VoLTE ऑन असल्याची खात्री करा.
अँड्रॉइडवर असं वापरा
अँड्रॉइडवर वाय फाय कॉलिंग फीचर वापरण्यासाठी Settings मध्ये Connections पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Wifi calling पर्याय निवडून टॉगल टर्न ऑन करा.
हे वाचा : LockDown मध्ये केंद्राचा मोठा निर्णय, BSNLच्या ग्राहकांना मिळणार हे गिफ्ट
आयफोनमध्ये असं करा सेटिंग
आयफोनमध्ये वायफाय कॉलिंग ऑन करण्यासाठी Settings मध्ये Phone पर्याय निवडा. त्यामध्ये वाय फाय कॉलिंगमध्ये जाऊन टॉगल टर्न ऑन करा.
वाय फाय कॉलिंग कसं करायचं?
वाय फाय कॉलिंग करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये बिल्ट इन फीचर असतं. त्याचा वापर कऱण्यासाठी वेगळ्या अॅपची गरज नाही. यासाठी वाय फाय कॉलिंगचा वापर करा. यावेली तुम्हाला स्मार्टफोनच्या डिफॉल्ट डायर अॅपमध्ये जाऊन नंबर डायल करावा लागेल. स्मार्टफोनला जर नेटवर्क कमी असल्याचं डिटेक्ट होत असेल तर तो आपोआप वायफाय कॉलिंगवर स्विच होतो.
हे वाचा : Jio, Vodafone, Airtel ची बंपर ऑफर, डेली 1.5 GB ऐवजी मिळणार 3 GB डेटा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus