मुंबई, 8 नोव्हेंबर: देशभरात काही महिन्यांपूर्वी 5G नेटवर्क लॉंच करण्यात आलं. प्रमुख शहरांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे कंपन्या वैविध्यपूर्ण फीचर्ससह 5G सुविधा असलेले स्मार्टफोन बाजारात लॉंच करत आहेत. देशी स्मार्टफोन ब्रॅंड असलेल्या लाव्हा कंपनीने भारतात सर्वांत स्वस्त 5G स्मार्टफोन नुकताच लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत.
लाव्हा ब्लेझ 5G हा नवा स्मार्टफोन भारतात लॉंच झाला आहे. या फोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने इंडिया मोबाइल कॉंग्रेसमध्ये याविषयीची माहिती दिली होती. या नवीन स्मार्टफोनमध्ये द मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर आणि 7GB पर्यंत रॅम आहे.
लाव्हा ब्लेझ 5G या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा 2.5D कर्व्ह्ड स्क्रीन आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 7nm प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. कंपनीने या फोनमध्ये 4GB रॅम दिली आहे. या फोनमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅम ऑप्शन दिला आहे. याचा अर्थ तुम्ही या फोनमधली रॅम 7GB पर्यंत वाढवू शकता. यात 128GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. युझर्स मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ही मेमरी 1TB पर्यंत वाढवू शकतात.
हेही वाचा: केवळ 999 रुपयांत मिळतोय 'हा' तगडा 5G स्मार्टफोन,108MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स
फोटोग्राफीसाठी या नवीन स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यासोबत डेप्थ सेन्सर आणि एक मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या पुढच्या बाजूला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. लाव्हा ब्लेझ 5G या नवीन स्मार्टफोनमध्ये ड्युएल सिम कार्डची सुविधा असून तो अँड्रॉइड 12 वर चालतो. सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
लाव्हा ब्लेझ 5G मध्ये दमदार 5000mAh बॅटरी आहे. हा फोन 5G/SA/NSA सपोर्ट असलेला आहे. यात 1/3/5/8/28/41/77/78 बॅंड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
लाव्हा ब्लेझ 5G हा नवीन स्मार्टफोन ग्राहकांना 9999 रुपये या प्रारंभिक किमतीत खरेदी करता येईल. हा फोन अॅमेझॉन या ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध आहे. स्टॉक संपेपर्यंत ग्राहकांना हा फोन या किमतीत खरेदी करता येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने या फोनसोबत एक खास सुविधा दिली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांना घरबसल्या मोफत सेवा देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही तुमचा हा फोन घरबसल्या दुरुस्त करू शकता. सध्या फोन खरेदी केल्यास कंपनीने ग्राहकांना 1599 रुपयांचे प्रोबड्स विनाशुल्क जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone