मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /केवळ 999 रुपयांत मिळतोय 'हा' तगडा 5G स्मार्टफोन,108MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स

केवळ 999 रुपयांत मिळतोय 'हा' तगडा 5G स्मार्टफोन,108MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स

केवळ 999 रुपयांत मिळतोय 'हा' तगडा 5G स्मार्टफोन,108MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स

केवळ 999 रुपयांत मिळतोय 'हा' तगडा 5G स्मार्टफोन,108MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स

मोटोरोला G 60 या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असून, हा फोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. 6GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये असलेल्या या मोबाइलची मूळ किंमत 21,999 रुपये आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 5 नोव्हेंबर: दिवाळीच्या निमित्तानं नुकतेच अनेक जणांनी मोबाइलसह इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या विविध ऑफरचा लाभ घेत स्वस्त वस्तू खरेदीचा अनुभव घेतला. आता नवीन मोबाइल घ्यायचा असेल तर पुढील सणातील ऑफरची प्रतीक्षा करावी लागणार असं अनेकांना वाटत असेल. पण 5G मोबाइल खरेदी करायचा असल्यास फ्लिपकार्टने मोटोरोला G 60 हा मोबाइल सर्वांत स्वस्त किमतीत उपलब्ध केला आहे. फ्लिपकार्टवर 31 टक्के सूट, बँकेकडून सवलत आणि एक्स्चेंज ऑफरसह हा फोन 999 रुपयांपर्यंतही खरेदी करता येऊ शकतो.

    मोटोरोला G 60 या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असून, हा फोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. 6GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये असलेल्या या मोबाइलची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. 31 टक्के सवलत ग्राह्य धरली तर हा फोन 14,999 रुपयांना मिळू शकतो. हा फोन खरेदी करायचा असेल तर बँक ऑफरचा फायदाही घेता येईल. फ्लिपकार्ट एक्सिस कार्डवरून पेमेंट केले तर 5 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाऊ शकते.

    काय आहे एक्स्जेंच ऑफर-

    मोटोरोला G60 हा मोबाइल फोन खरेदी करायचा असेल तर चांगली एक्स्चेंज ऑफर मिळू शकते. यात 14 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. परंतु, एक्स्जेंचमध्ये दिल्या जाणाऱ्या फोनचे मॉडेल कोणते आहे आणि तो कशा स्थितीत आहे यावरही बरच काही अवलंबून असेल. एक्स्चेंज ऑफरची किंमत पूर्ण लावली तर मोटोरोला G60 हा फोन 999 रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकतो.

    हेही वाचा: स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक

    मोटोरोला G60 मोबाइलची वैशिष्ट्यं-

    मोटोरोला G60 मोबाइलच्या वैशिष्टांबद्दल बोलायचे झाल्यास याचा IPS LCD डिस्प्ले 6.8 इंचाचा आहे. याचे रेझोल्यूशन 1080 x 2460 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz आहे. याची लांबी 169.6mm, रुंदी 75.9mm, जाडी 9.8mm आणि वजन 225 ग्रॅम इतके आहे. अँड्राइड 12 या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी फोन काम करतो. Qualcomm SM7150 Snapdragon 732G (8 nm) प्रोसेसर असून, यावर मोबाइल काम करतो. मोटोरोला G60 मोबाइलचा पहिला कॅमेरा 108MP, f/1.9 अपर्चरसह आहे. 8MP चा दुसरा कॅमेरा f/2.4 अपर्चरसह आणि 2MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फ्रंटला f/2.2 अपर्चरसह 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाइल फोनसह 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

    दरम्यान, फ्लिपकार्टवरील ही डील स्वस्त मानली जात आहे. ज्यांनी दिवाळी सणात मोबाइल खरेदीसाठी ऑफर घेतली नसेल त्यांच्यासाठी ही एक संधी असल्याचं बोललं जात आहे.

    First published:

    Tags: Discount offer, Smartphone