मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अगदी कमी किंमतीत वापरा 3 कॅमेराचा फोन, 'या' फोनमध्ये आहेत नवे फीचर

अगदी कमी किंमतीत वापरा 3 कॅमेराचा फोन, 'या' फोनमध्ये आहेत नवे फीचर

आता स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 कॅमेरे मिळणार आहेत. LG कंपनीनं आणलेल्या नव्या फोनमध्ये 3 कॅमेऱ्यांसोबतचं अल्ट्रा वाइट एंगल लेंस देखिल देण्यात आलीय.

आता स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 कॅमेरे मिळणार आहेत. LG कंपनीनं आणलेल्या नव्या फोनमध्ये 3 कॅमेऱ्यांसोबतचं अल्ट्रा वाइट एंगल लेंस देखिल देण्यात आलीय.

आता स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 कॅमेरे मिळणार आहेत. LG कंपनीनं आणलेल्या नव्या फोनमध्ये 3 कॅमेऱ्यांसोबतचं अल्ट्रा वाइट एंगल लेंस देखिल देण्यात आलीय.

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई,28 फेब्रुवारी: नवा स्मार्टफोन घेताना अनेकजण त्यामध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याची क्वॉलिटी पाहतात. स्मार्टफोन युजर्स फोनचा कॅमेरा किती मेगापिक्सल आहे, त्याच्यामध्ये कोणते नवे फीचर्स आहेत हे बघून फोन खरेदी करत असतात. आता कॅमेराचे नवनवीन फीचर्स असलेले मोबाईल अनेक कंपन्या ग्राहकांसाठी घेवून येत आहेत. स्मार्टफोन बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली एलजी कंपनी नवा फोन भारतात आणण्याच्या तयारीत आहे.

एलजी कंपनी भारतात आपल्या नव्या सीरिजचे फोन लॉंच करणार आहे. भारतीय ग्राहकांसाठी एलजी कंपनी आता ‘Q’ सीरिजचा नवा फोन ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. अनेक वैशिष्ट्यांसह ही कंपनी आपली नवीन सीरिज भारतात लॉंच करणार आहे. ‘LGQ51’ हा फोन लवकरच भारतात येणार आहे. या कंपनीनं नुकताच दक्षिण कोरियात हा फोन लॉंच केला आहे.

एलजी कंपनीचा हा नवा फोन 6.5 इंच फुल डिस्प्ले असलेला आहे. या फोनची खास बात म्हणजे यात ऑक्टा-कोर प्रोसेसर असणार आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी फोन मेमरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये तीन कॅमेरे असणार आहेत. प्राईमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल, सेकेंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाइट एंगल लेंस देखिल देण्यात आली आहे. यासोबतचं २ मेगापिसक्सल डेप्थ सेंसर सुद्धा या फोनमध्ये असणार आहे.

या कॅमेरामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगची जबाबदारी 13 मेगापिक्सल कॅमेरावर आहे. एलजीच्या स्मार्टफोनमध्ये युजर्स जरी 3 कॅमेरे देण्यात आले तरी देखिल यात 13 मेगापिक्सल कॅमेरा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

LG च्या नव्या फोनमध्ये कोणती आहेत फीचर्स?

LGQ51C मध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि यूसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. या फोनमध्ये फिंगर प्रिंट सेंसर देखिल देण्यात आला आहे. फोनच्या मागच्या बाजूला हा सेंसर लावण्यात आलाय.स्मार्टफोनमध्ये 4,000 एमएएच बॅटरी आहे. या फोनची किंमत 19,000 पर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हा स्मार्टफोन अद्याप भारतात लॉंच झालेला नाही आहे. त्यामुळे फोटोप्रेमींना या फोनची वाट पाहावी लागणार आहे. मात्र येत्या काही दिवसात या फोनची ऑनलाईन बुकिंग सुरू होणार आहे.

इतर  बातम्या:Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर

‘तुझी बायको तुझ्याहून10 वर्षांनी मोठी आहे’ निकनं ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

First published:

Tags: Mobile, Mobile app