मुंबई, 27 फेब्रुवारी : बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सोलिब्रेटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा असते. त्यात करुन जर एखाद्या सेलिब्रेटीचं नवीनच लग्न झालेलं असेल तर मग लोकांना जास्त उत्सुकता असते की त्यांच्या लाइफमध्ये काय चाललंय. असंच काहीसं होत आहे ग्लोबल कपल प्रियांका आणि निक जोनस यांच्यासोबत. या दोघांच्या लग्नाला आता 1 वर्ष होऊन गेलं असलं तरीही त्याच्या वयातील फरकामुळे आजही या दोघांना ट्रोल केलं जातं. पण आता या ट्रोलिंगवर निक जोनस पहिल्यांदाच बोलला आहे आणि यासोबतच त्यानं सर्वच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. निक जोनस प्रियांका चोप्रा पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आता निकचं वय 27 वर्षं आहे. तर प्रियांका 37 वर्षांची आहे. निक सध्या सिंगिंग रिअलिटी शो द वॉइसमुळे चर्चेत आला आहे. निक या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. या शोमध्ये आणखी एक जज आहे जिचं नाव आहे कॅली क्लार्कसन. कॅली आणि निक एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. त्यामुळे शो च्या सेटवर नेहमीच धम्माल गप्पा होत असतात. अशाच निकची मस्करी करताना कॅलीनं त्याला प्रश्न विचारला की माझं वय 37 आहे, तुझं कदाचित 27 आहे ना? यावरुन तिच्या बोलण्याचा रोख नक्की काय आहे हे निकला समजलं. शाहरुखसाठी 3 तास हवेत लटकत राहिली शिल्पा, कारण वाचून कराल कौतुक
कॅलीनं निकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं तिला लगेचच उत्तर दिलं- ‘माझ्या बायकोचं वय 37 आहे आणि मला याचा काही फरक पडत नाही.’ निकचं हे उत्तर ऐकून समोर बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसले. तर निक सुद्धा हा क्षण एन्जॉय करताना दिसला. यासोबतच निकनं या दोघांच्या वयातील अंतरावरुन ट्रोल करणाऱ्या प्रत्येकाला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘सविताभाभी तुझा आकार…’ अश्लिल उद्योग मित्र मंडळाचा कहर, गाणं आलं समोर VIDEO
निकच्या आधी प्रियांका चोप्रालाही अशाप्रकारच्या प्रश्नाना सामोरं जावं लागलं आहे. एका मुलाखतीत प्रियांकालानं त्याच्या वयातील अंतराविषयी बोलताना म्हटलं होतं, ‘या गोष्टीमुळे मला काहीच फरक पडत नाही. मला वाटतं मीडिया सुद्धा आम्हाला दोघांना ट्रोल करणाऱ्या लोकांना जास्त महत्त्व देते आहे आणि आम्हाला दोघांनाही अशा ट्रोलर्सबद्दल बोलणं अजिबात आवडत नाही. अशा 150 लोकांनाही आमच्या बद्दल असं काही बोललं तरीही माझा दृष्टीकोण बदलणार नाही.’ OMG! वाढदिवसाला या अभिनेत्रीने फक्त शर्ट घालून केला फोटो पोस्ट

)







