जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर

Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर

Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर

आता गुगलवरून एका क्लिकवर तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. घरी बसल्या बसल्या आता तुम्हाला गुगल सर्चवर फोनचा रिचार्ज करता येणार आहे. जाणून घ्या कसं करायचं रिचार्ज?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी: फोनचा रिचार्ज करण्यासाठी अनेक लोक जास्त करून मोबाईल अॅपचा वापर करतात. तर काही लोक वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर करतात. मात्र अनेकदा रिचार्ज करताना त्याच्या किचकट पद्धतीमुळे तुम्हाला त्रास होतं असतो. पण आता तुम्हाला फोनचा रिचार्ज एका क्लिकवर करता येणार आहे. आता तुम्हाला फोन रिचार्जसाठी कोणत्याही वेबसाईटची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला आता कोणत्याही अॅप किंवा वेबसाईच्या शिवाय Google वरून एका क्लिकवर रिचार्ज करता येणार आहे. Google नं अड्रॉयड स्मार्टफोनच्या यूजर्ससाठी प्रीपेड सीमकार्डचा रिचार्ज करण्यासाठी नवं फीचर आणल आहे. या नव्या फीचर मधून रिचार्ज करण अगदी सहज सोपं आहे. या फिचरमध्ये तुम्हाला ऑपरेटरच्या नवे प्लॅन पाहता येणार आहे. तसंच तुमच्या नंबरवर असलेल्या खास ऑफर्स देखिल तुम्हाला याठिकाणी पाहता येणार आहेत. कसं करायचं गुगलवरून रिचार्ज? पहिली स्टेप - गुगलवरू जावून सर्च बॉक्सवर टाईप करा. ‘Sim recharge’ दुसरी स्टेप - समोर एक पेज ओपन होईल. यामध्ये फोन नंबर टाकण्याचा ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करा. ज्याच्या नंतर ऑपरेटरचं नाव विचारल जाईल. यानंतर तुमच्या मोबाईल ऑपरेटरच्या वेगवेगळ्या प्लॉनची लिस्ट येईल. तिसरी स्टेप - यानंतर ‘Browse Plans’ बटणार क्लिक करा. चौथी स्टेप - समोर आलेल्या प्लॅनमधला तुन्हाला हवा तो पर्याय निवडा पाचवी स्टेप - यानंतर तुमच्या समोर पेमेंट ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला हवा असलेला योग्य पर्याय निवडा. सहावी स्टेप – यानंतर तुमचा रिचार्ज होईल. गुगलच्या या नव्या फिचरमुळे जलदगतीनं रिचार्ज करता येणार आहे. —————– अन्य बातम्या धक्कादायक! तुमच्या WhatsApp ग्रुपची लिंक गुगलवर, कोणीही होऊ शकतं ADD? iQOO 3 भारतात आणखी एक स्वस्त 5G फोन लाँच; ‘ही’ आहे किंमत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Recharge
  • First Published :
जाहिरात
जाहिरात