नवी दिल्ली, 26 मे : कू अँपने (Koo App) 30$ मिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 218 कोटी रुपये सिरीज बी च्या राउंड मध्ये (Series B Investment) उभे केले. Tiger Global ने या राऊंडचे नेतृत्व केले आणि सोबत अगोदरचे इन्वेस्टर एक्सेल पार्टनर, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर, आणि ड्रीम इनकूबेटर ह्या सर्वानी ह्यात भाग घेतला. त्यासोबतच IIFL आणि मीराइ ऍसेट हे नवीन इन्व्हेस्टर सुद्धा ह्या राऊंड मध्ये सहभागी झालेत.
Twitter चा भारतीय स्पर्धक म्हणून नावारूपाला आलेल्या Koo App मध्ये गेल्या वर्षभरात भरीव गुंतवणूक केली गेली आहे. भारतीय भाषांमध्ये व्यक्त होण्यासाठीचा कू हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. एका वर्षात कू 60 लाख डाउनलोड झालेत आणि दररोज यूजर ऍक्टिव्हली पोस्ट करत आहेत. कू वर सहभागी झालेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यात बॉलिवूड चे अनुपम खेर, कंगना राणावत, केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, पियुष गोयल, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर त्यासोबत काँग्रेसचे कमलनाथ, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, जेडीस चे व माजी पंतप्रधान देवेगौडा, भीम आर्मी चे चीफ चंद्रशेखर आझाद, आम आदमी पार्टीचे राजेंद्र पाल गौतम. स्पोर्ट्स मध्ये ज्यांनी जागतिक पातळीवर देशाचे नाव कमावले आहे त्यात सायना नेहवाल, बायचुंग भुतिया, मेरी कोम ह्या व्यक्तींचा समावेश आहे.
कू ची स्थापना अप्रमेय राधाकृष्ण व मयंक बिडवाटका ह्या दोघांनी केली आहे. अप्रमेय सिरीयल उद्योजक असून त्यांनी टॅक्सी फॉर शुअर ह्या कंपनीची स्थापना केली आहे. नंतर ती ओला ने घेतली. मयंक ह्यांनी अगोदर मेडियाअन्त आणि गुडबॉक्स ची स्थापना केली होती.
अप्रमेय राधाकृष्ण, सह-संस्थापक आणि कू चे CEO म्हणाले की, पुढील काही वर्षांत जागतिक पटलावर सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लँटफॉर्म निर्मितीकरिता आमची आक्रमक योजना आहे. प्रत्येक भारतीय आमच्याकडे ह्या दृष्टीने पाहत आहे आणि आम्ही लवकरच हे स्वप्न साकार करू. टायगर ग्लोबल हे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य भागीदार आहेत.'
काय आहे कू?
कू ची स्थापना 2020 च्या मार्च महिन्यात भारतीय भाषांमध्ये मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली होती. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, भारतातील विविध प्रदेशांतील लोक त्यांच्या मातृभाषेतून व्यक्त होऊ शकतात. ज्या देशात भारत केवळ १०% इंग्रजी बोलतो, अशा सोशल मीडिया व्यासपीठाची नितांत आवश्यकता आहे जी भारतीय वापरकर्त्यांकडे मातृभाषेचा अनुभव देऊ शकेल आणि एकमेकांशी संपर्क साधण्यास मदत करेल. भारतीय भाषांना प्राधान्य देणार्या भारतीयांच्या आवाजाला कू एक मंच प्रदान करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Koo App, Social media, Twitter