मुंबई 1 सप्टेंबर : आपण हे पाहिलं असेल की, बहुतांश वस्तुंवर एक कोड लागलेला असतो, जो आपल्याला त्या वस्तुबद्दल माहिती आणि किंमत सांगतो. ज्याचा वापर बऱ्याचदा मॉलमध्ये केला गेल्याचं तुम्ही पाहिलं असणार. अनेक वर्षापासून आपण हा कोड पाहिलं असणार, ज्याला बारकोड म्हणतात. परंतू काही काळानंतर बाजारात क्यूआर कोड देखील येऊ लागला. काही प्रोडक्टवर आता क्यूआर कोडने जागा घेतली, तसेच पैसे देण्यासाठी देखील अनेक ठिकाणी क्यूआर कोडचा वापर केला जातो. परंतु आता बऱ्याच लोकांना या दोन कोडमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
चला आपण या दोघांमधील फरक आणि साम्य समजून घेऊ.
जर आपण या दोन्ही कोडची डिझाइन पाहिली तर बार कोड हा एक-आयाताकृती, सरळ रेषेचा गट असतो, ज्यामध्ये कोणत्याही ठिकाणाशी, वस्तूंशी संबंधित माहिती असते. दुसरीकडे, क्यूआर कोड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड हा एक 2डी कोड आहे, ज्यामध्ये एका रेषेऐवजी लहान चौरसांचा समूह आहे आणि त्याद्वारे माहिती घेतली जाऊ शकते आणि माहिती पाठविली जाऊ शकते.
QR कोड
पेमेंट करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी आम्ही अनेकदा क्विक रिस्पॉन्स कोड वापरतो. दुसरीकडे, एखादे ऍप डाउनलोड करायचे असो, एखादा कार्यक्रम बुक करायचा किंवा वेबसाइटला भेट द्यायची असो, आम्ही QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला गंतव्यस्थान मिळते.
क्यूआर कोडचा वापर सर्वप्रथम 1994 मध्ये ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्ट्सशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात आला. जो तुम्ही तुमच्या फोन, टॅबलेट किंवा स्कॅनरने स्कॅन करू शकता.
हे वाचा : जगातील सगळ्यात महागडी कॉफी, तिच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही ती फ्रीमध्ये ही पिणार नाही
बार कोड
बार कोडच्या माध्यमातून कोणताही माल कुठे बनवला गेला, त्यात कोणते साहित्य वापरले गेले, तो केव्हा बनवला गेला, त्याची एक्सपायरी कधी झाली, तो कोणत्या ट्रेडमार्कखाली बनवला गेला इत्यादी माहिती मिळते. लहान जागेत मोठा डेटा एकत्रित करण्याचा बारकोड हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
बार कोड केवळ वस्तूंच्या पॅकेटवरच नाही तर सिनेमा हॉल, हॉस्पिटल, रेस्टॉरंट इत्यादींच्या बिलांवरही दिसतो. बार कोड स्कॅन करण्यासाठी स्कॅनर आवश्यक आहे.
परंतु नंतर असे काही ऍप आले, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या फोन, टॅब्लेट किंवा डेस्कटॉपवर एक विशेष ऍप डाउनलोड करून बार कोड स्कॅन करू शकता.
सोप्या भाषेत, डेटा दोन्ही कोडमध्ये संग्रहित केला जातो म्हणजे QR कोड आणि बार कोड हे तसं सारखंच आहे. परंतु जिथे आपण बार कोडमधील डेटा फक्त पाहू शकतो, तिथे प्रवेश करू शकतो, क्यूआर कोडमधील डेटा ऍक्सेस करताना आपण डेटा देखील शेअर करू शकतो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही सुपरमार्केटमधील नूडलच्या पॅकेटवर बार कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्याची उत्पादन तारीख, ठिकाण, निर्माता, वितरक, एक्सपायरी यासंबंधी माहिती मिळेल, परंतु बार कोड स्कॅन करून तुम्ही कोणतीही माहिती मिळवू शकता. परंतू ते इतर कोणत्याही व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही.
दुसरीकडे, सुपरमार्केटच्या पेमेंट काउंटरवर QR कोड स्कॅन करून, जिथे तुम्हाला पैसे देणाऱ्याचे नाव, बँकेचे नाव इत्यादी माहिती मिळते, परंतू बारकोडचा वापर करुन तुम्ही तसं करु शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: QR code payment, Viral news