मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Facebook चं नाव बदलल्यानं WhatsApp चं बदलणार लूक? WhatsApp वर काय होणार परिणाम? वाचा

Facebook चं नाव बदलल्यानं WhatsApp चं बदलणार लूक? WhatsApp वर काय होणार परिणाम? वाचा

कंपनीचं नाव बदललं तरी कंपनीच्या कामात कोणताही बदल होणार नाही हेही झुकरबर्ग स्पष्ट केलं होतं.

कंपनीचं नाव बदललं तरी कंपनीच्या कामात कोणताही बदल होणार नाही हेही झुकरबर्ग स्पष्ट केलं होतं.

कंपनीचं नाव बदललं तरी कंपनीच्या कामात कोणताही बदल होणार नाही हेही झुकरबर्ग स्पष्ट केलं होतं.

  हल्ली सोशल मीडियाशिवाय (Social Media) कुणाचंच पान हलत नाही. अनेकजण तर आपल्या आयुष्यातल्या अनेक छोट्या छोट्या घटनाही सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (WhatsApp) हे तर आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहेत. त्यात काही बदल झाले तर त्याची जोरदार चर्चा सगळीकडेच सुरु होते. गेल्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात फेसबुकनंही एक अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. जगप्रसिद्घ सोशल मीडिया कंपनी Facebook चं नाव बदलून मेटा (Meta) करत असल्याचं Facebook चे सीईओ (CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी जाहीर केलं होतं. याचा परिणाम त्याच्या अन्य कंपनींवरही दिसतोय. पण कंपनीचं नाव बदललं तरी कंपनीच्या कामात कोणताही बदल होणार नाही हेही झुकरबर्ग स्पष्ट केलं होतं. याबद्दलचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे.

  नेमका काय बदल झाला

  2.21.220.24 च्या बीटा व्हर्जनमध्ये (Beta Version) व्हॉट्सॲपच्या डेव्हलपर्सने ‘व्हॉट्सॲप फ्रॉम फेसबुक’ (What’s App from Facebook) ही ओळ आता काढून टाकली आहे. फेसबुक व्हॉट्सॲपची पेरेंट कंपनी (Parent Company) असल्यामुळे आपण फोनवर किंवा कंप्युटरवर व्हॉट्सॲप सुरु केलं की ही ओळ हमखास दिसायची. आता मात्र ती दिसणार नाही. त्याऐवजी आता ‘व्हॉट्सॲप फ्रॉम मेटा’ (WhatsApp From Meta) असं वाक्य दिसेल. त्याचबरोबर व्हॉट्सॲपच्या सेटिंग मेन्यूमध्ये असलेला फेसबुकचा उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. कंपनीचं नाव बदलल्यामुळे हा महत्वाचा बदल झाल्याचं लक्षात येईल. मात्र व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांची नावं (will names of WhatsApp and Instagram change due to Meta?) तीच राहणार आहेत.

  घरबसल्या Twitter वरुन कमवा पैसे? त्यासाठी करा असं की व्हाल 'मालामाल'

  व्हॉट्सॲपचं नवं बिटा व्हर्जन

  व्हॉट्सॲपच्या बिटा व्हर्जनमध्येही आणखी काही बदल होणार आहेत. या बिटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सॲपच्या बिझनेस अकाउंटच्या (Business Accouunt) मेसेजेसचं मूल्यमापन (Evaluation) केलं जाऊ शकतं. अर्थात हे व्हर्जन सध्यातरी चाचणीच्या म्हणजेच टेस्टिंगच्या फेजमध्ये आहे आणि काही आठवड्यांतच हे व्हर्जन सर्व युजर्ससाठी रोल आऊट होईल.

  मेटा हा शब्द ‘मेटाव्हर्स’ (Metaverse) या शब्दावरून घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात फेसबुकनं आपल्या कंपनीचं नाव बदलून मेटा ठेवलं आहे. मात्र कंपनीचं नाव बदलल्यानं त्याच्या कॉर्पोरेट स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर प्रॉडक्ट्समध्ये कोणताही बदल होणार नाही असं फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे.

  फेसबुकचं नाव बदलल्यानंतर आता आणखी नवीन काय बदल होणार याबब्त युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नाव बदललं तरी लोकांना जोडण्याचं काम करणं हेच आमचं मुख्य मिशन आहे आणि तेच यापुढेही कायम असेल असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

  First published:

  Tags: Facebook, Whatsapp