मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! तुमच्या स्मार्टफोनवर कोणाची नजर तर नाही ना? 'हे' नंबर करा Dial आणि लगेच ओळखा

सावधान! तुमच्या स्मार्टफोनवर कोणाची नजर तर नाही ना? 'हे' नंबर करा Dial आणि लगेच ओळखा

आज आम्ही तुम्हाला असे काही नंबर्स सांगणार आहोत जे Dial करून तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर तर नाही ना?

आज आम्ही तुम्हाला असे काही नंबर्स सांगणार आहोत जे Dial करून तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर तर नाही ना?

आज आम्ही तुम्हाला असे काही नंबर्स सांगणार आहोत जे Dial करून तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर तर नाही ना?

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 21 जुलै: स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आपण आपल्या सोयीसाठी करतो. मात्र काही गुन्हेगारी (Cyber Crime) प्रवृत्तीची लोकं स्मार्टफोनचा उपयोग वाईट कामांसाठी करतात. काही अप्लिकेशन्सचा वापर करून या गुन्हेगारांकडून आपला फोन Hack केला जातो आणि आपली फसवणूक होते किंवा आपला खासगी डेटा चोरी (Data Leak) होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही नंबर्स सांगणार आहोत जे करून तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर तर नाही ना? हे जाणून घेऊ शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया.

*#62#

जर तुमच्या फोन कुठल्या दुसऱ्या ठिकाणी फॉरवर्ड होत असेल तर या कोडद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता. यासाठी वरील कोड तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवरून (Android Phones) डायल करायचा आहे, तसंच जर तुमच्या स्मार्टफोनच्या सेन्सॉरद्वारे तुम्हाला कोणी ट्रॅक करत असेल तर या कोडद्वारे तुम्हाला हे ही माहिती होऊ शकणार आहे

##002#

जर तुम्हाला तुमच्या फोनमधून सर्व प्रकारची रिडायरेक्टिंग बंद करायची असेल वरील दिलेला कोड आपल्या मोबाईलमध्ये डायल करा. जर तुम्ही रोमींगमध्ये जाणार असाल किंवा आंतरराष्ट्रीय कॉल्स (International Calls) करणार असाल तर तुम्ही या कोडद्वारे सर्व फॉरवर्ड होणारे कॉल्स बंद करू शकता.

हे वाचा -Netflix सब्सक्रायबर्ससाठी Good News! आता गेमिंग अ‍ॅप मिळणार मोफत

*#21#

वरील दिलेला कोड आपल्या स्मार्टफोनमध्ये डायल करा आणि कॉलची बटन दाबा. यामुळे तुम्हाला तुमचे कॉल कुठल्या दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड तर होत नाहीत ना याबद्दल माहिती मिळेल. इतकंच नाही तर तुमचा कोणता कॉल फॉरवर्ड होतोय तसंच किती नंबरवर फॉरवर्ड होतोय हे यामुळे आपल्याला कळणार आहे. हॅकर्स तुम्हाला येणारे कॉल्स मुद्दाम त्यांच्या नंबरवर फॉरवर्ड करतात. तसंच तुमच्यावर नजर ठेवण्यासाठीही हॅकर्सकडून याचा उपयोग होऊ शकतो. मात्र या कोडद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर असल्यास हे माहिती करून घेऊ शकता,

*#06#

हा नंबर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डायल करून आपल्या स्मार्टफोनचा IMEI नंबर माहिती करून घेऊ शकता. जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही या नंबरच्या मदतीनं तुम्ही आपला मोबाईल शोधू शकता किंवा ट्रॅक करू शकता.

First published:

Tags: Smartphone, Technology