मुंबई, 16 जुलै: राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून आज कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्यात अडचणी येत आहेत. राज्याचा दहावीचा निकाल तब्बल 99.95 टक्के लागला. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल नक्कीच जास्त आहे. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. खरंतर दरवर्षी बारावीचा निकाल हा दहावीच्या निकालाच्या आधी लागतो आणि परीक्षाही आधी होत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाचा - 10वीच्या विद्यार्थ्यांनो, निकाल तर लागला पण कधी होणार CET Exam? जाणून घ्या कधी जाहीर होणार निकाल शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता दहावीनंतर बारावीचा निकाल आता 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. कधी होणार अकरावी प्रवेशासाठी CET शालेय शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार, ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी नसून ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात अशांसाठी आहे. ही परीक्षा साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या (August last week) आठवड्यात किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.