Home /News /technology /

Airtel ला टक्कर देणारा ठरतोय Jio चा नवीन प्लॅन, 75 रुपयांत करा All In One Recharge

Airtel ला टक्कर देणारा ठरतोय Jio चा नवीन प्लॅन, 75 रुपयांत करा All In One Recharge

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आता एक नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid Recharge Plan) सादर केला आहे. ऑल इन वन (Jio All in One Plan) असं या प्लॅनचं नाव असून, तो केवळ 75 रुपयांचा आहे.

मुंबई, 31 जुलै: रिलायन्स जिओने (Reliance Jio) आता एक नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid Recharge Plan) सादर केला आहे. ऑल इन वन (Jio All in One Plan) असं या प्लॅनचं नाव असून, तो केवळ 75 रुपयांचा आहे. जिओने ऑल इन वन प्लॅन सादर केल्यामुळे अन्य मोबाइल कंपन्या, खासकरून एअरटेलला (Airtel) तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे. जिओच्या या ऑल इन वन प्लॅनमध्ये काय काय सुविधा आहेत, ते पाहू या. या प्लॅनमध्ये तीन जीबी इंटरनेट डेटा (3 GB Data) दिला जात असून, प्लॅनची व्हॅलिडिटी (Validity) 28 दिवसांची आहे. म्हणजे 28 दिवसांमध्ये तीन जीबी डेटा वापरता येतो. त्याशिवाय या प्लॅनमध्ये स्वतंत्रपणे 200 एमबी डेटाही दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंगची (Unlimited Calling) सुविधाही या प्लॅनसोबत आहे. तसंच 50 SMS देखील या प्लॅनमध्ये करता येतात. जिओच्या सर्व प्लॅन्समध्ये असलेली सुविधा याही प्लॅनमध्ये आहे. ती सुविधा म्हणजे जिओच्या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी अॅप्सना मोफत अॅक्सेस मिळतो. इंटरनेट, कॉलिंग, एसएमएस अशा सगळ्याच सुविधा फक्त 75 रुपयांत आणि 28 दिवसांसाठी या प्लॅनमधून उपलब्ध होत असल्याने त्याला ऑल इन वन असं नाव देण्यात आलं आहे. हे वाचा-लवकरच भारतात लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यं एअरटेलचं एंट्री लेव्हल रिचार्ज (Airtel Entry Level Recharge) म्हणजेच सर्वांत कमी रिचार्ज 49 रुपयांचं होता. 28 दिवसांची वैधता असलेल्या 49 रुपयांच्या त्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 38.52 रुपयांचा टॉकटाइम आणि 100 एमबी डेटा मिळत होता. 100 एमबी डेटा समाप्त झाल्यानंतर 0.50 रुपये प्रति एमबी एवढं शुल्क आकारलं जात होतं; मात्र हा प्लॅन 29 जुलै 2021 रोजीपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता कमीत कमी रिचार्ज 79 रुपयांचं करावं लागणार आहे. हे वाचा-6000 mAh बॅटरी असणाऱ्या फोनवर मिळवा भरघोस सूट; पाहा काय आहे सॅमसंगची भन्नाट ऑफर 49 रुपयांचा प्लॅन बंद केल्यामुळे एअरटेल कंपनीने 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही सुधारणा केल्या. 79 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून, त्यात 64 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसंच 200 एमबी इंटरनेट डेटाही मिळतो. एक पैसा प्रति सेकंद या दराने लोकल आणि एसटीडी कॉलचा दर आकारला जातो. एअरटेलचा हा प्लॅन चांगला असला, तरी जिओच्या ऑल इन वन प्लॅनच्या तुलनेत त्यात उपलब्ध असलेल्या सुविधा कमी आहेत. त्यामुळे जिओच्या ऑल इन वन प्लॅनमुळे एअरटेलला चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे.
First published:

Tags: Airtel, Reliance Jio

पुढील बातम्या