मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लवकरच भारतात लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यं

लवकरच भारतात लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यं

रेडमी 15.6 इंचाचा डिस्प्ले आणि पूर्ण एचडी रेझिल्युशन (Full HD Resolution) असलेला लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप एक एलसीडी सपोर्ट (LCD Support) पॅनेलसह असेल.

रेडमी 15.6 इंचाचा डिस्प्ले आणि पूर्ण एचडी रेझिल्युशन (Full HD Resolution) असलेला लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप एक एलसीडी सपोर्ट (LCD Support) पॅनेलसह असेल.

रेडमी 15.6 इंचाचा डिस्प्ले आणि पूर्ण एचडी रेझिल्युशन (Full HD Resolution) असलेला लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप एक एलसीडी सपोर्ट (LCD Support) पॅनेलसह असेल.

नवी दिल्ली 31 जुलै : शाओमी (Xiaomi) रेडमी (Redmi) कंपनीचा RedmiBook 15 हा लॅपटॉप (Laptop) लवकरच भारतात सादर होत आहे; मात्र त्यापूर्वीच त्याची वैशिष्ट्यं (Features) आणि किंमत (Price) ही माहिती लीक (Leak) झाली आहे. शाओमीचा सब-ब्रँड रेडमी भारतात आपला पहिला लॅपटॉप सादर करण्यासाठी तयारी करत आहे. 3 ऑगस्टला रेडमी भारतात RedmiBook सीरिज सादर करणार आहे. या लॅपटॉपमध्ये 11 जनरेशन टायगर लेक प्रोसेसर असेल आणि हा लॅपटॉप चारकोल ग्रे रंगामध्ये उपलब्ध असेल, असा दुजोरा कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. एका वृत्तानुसार, भारतात RedmiBook ची वैशिष्ट्यं आणि किंमत ही माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या वृत्तातील दाव्यानुसार, रेडमी 15.6 इंचाचा डिस्प्ले आणि पूर्ण एचडी रेझिल्युशन (Full HD Resolution) असलेला लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप एक एलसीडी सपोर्ट (LCD Support) पॅनेलसह असेल. तसंच हा लॅपटॉप 11 जनरेशनच्या कोअर आय 3 (CORE i3) आणि कोअर आय 5 व्हॅरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह उपलब्ध होईल. हा लॅपटॉप PCle SSD आणि 256GB आणि 512GB अशा आणखी दोन पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. हा लॅपटॉप विंडोज 10 ला आउट ऑफ द बॉक्स बूट करेल.

6000 mAh बॅटरी असणाऱ्या फोनवर मिळवा भरघोस सूट; पाहा काय आहे सॅमसंगची भन्नाट ऑफर

पोर्ट आणि कनेक्टिव्हिटीचा विचार करता, या लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट असेल. तसंच यात 2W चे दोन स्पीकर असतील. एक यूएसबी टाइप-सी 3.1, यूएसबी टाइप –ए, यूएसबी 2.0, एचडीएमआय असे पोर्ट्स आणि एक 3.5 एमएमचा ऑडियो जॅकदेखील या लॅपटॉपमध्ये दिला जाईल. तसंच या लॅपटॉपमध्ये एक एचडी कॅमेराही (HD Camera) असेल. या लॅपटॉपच्या बॅटरीबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी यात 65 W चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी असेल, असं सांगितलं जात आहे.

अशी असेल किंमत

शाओमी 3 ऑगस्टला भारतात RedmiBook चा 14 इंच स्क्रीनचा नवा व्हॅरिएंटदेखील लाँच करण्याची शक्यता आहे. परंतु, यास अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. भारतात RedmiBook 15 ची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. किमतीबाबतची ही चर्चा खरी असेल तर हा लॅपटॉप एसर (Acer) स्विफ्ट 3, असूस व्हिव्होबुक आणि शाओमीच्याच एमआय नोटबुक 14 होरायझन एडिशनला चांगली टक्कर देऊ शकतो.

First published:

Tags: Redmi, Xiaomi