मुंबई, 22 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांना मणक्याचा त्रास जाणवत आहे. आज त्यांच्यावर स्पाइन शस्त्रक्रिया (Spine Surgery) यशस्वी झाली आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स एचएन रुग्णालयामध्ये फिजिओथेरपी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक असून योग्य वेळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
मानदुखीने त्रस्त...
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानदुखीच्या त्रासाने ग्रस्त झाले होते. त्यांना खूप त्रास होत होता. अनेक सार्वजानिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मानेला पट्ट्याचा आधार घेऊन बसल्याचे दिसले आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच सीएमओकडून देण्यात आली होती.
हेही वाचा-अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 4 जणांना अटक
तसेच 8 नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे गळ्याभोवती आधारासाठी पट्टा बांधलेले दिसले होते. त्यानंतर, त्यांच्या मणक्याचा त्रास वाढत गेल्यानं त्यांना रिलायन्स एच एन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी त्यांच्यावर स्पाइन सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती ठीक असून त्यामध्ये सुधारणा होतं आहेत. काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav thackeray