मुंबई, 18 जानेवारी : एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या दूरसंचार कंपन्यांच्या काही प्रीपेड प्लॅन्समध्ये ( prepaid plans) दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. तसंच त्यांच्या अनेक प्रीपेड प्लॅनमध्ये SMS आणि फ्री कॉलिंग बेनिफिट (Free Calling Benefit) ऑफर दिली जात आहे. हे प्लॅन्स अशा युझर्ससाठी फायदेशीर आहेत, जे जास्त डेटासोबत विविध बेनिफिट ऑफर्स शोधत आहेत. याशिवाय दूरसंचार ऑपरेटर कंपन्या त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार ( Disney + Hotstar), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि इतर अॅप्सची लाइव्ह स्ट्रीमिंग यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनचे अतिरिक्त बेनिफिटदेखील देतात. अशाच काही प्लॅन्सची ही माहिती...
जिओचा 419 रुपयांचा प्लॅन
28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये कंपनी रोज 3 जीबी डेटा ऑफर करते. याचाच अर्थ यामध्ये तुम्हाला एकूण 84 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएससह, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते.
स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर! OnePlus 9RT 5G भारतात उपलब्ध, सवलतीत करा खरेदी
जिओचा 601 रुपयांचा प्लॅन
28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3 जीबी डेटा या प्लॅनमध्ये येतो. तसंच कंपनी युझर्सना 6 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ही सुविधा यामध्ये मिळेल. तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी (Disney + Hotstar VIP) आणि जिओच्या सर्व अॅप्सचं (jio app) सबस्क्रिप्शन मिळेल.
एअरटेलच्या प्लॅनमध्ये विविध बेनिफिट्स
एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवसांची असून, त्यामध्ये अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, दररोज 3 जीबी डेटा, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. यातून अपोलो 24 (Apollo 24) प्लॅनदेखील ऑफर केला जातो. यामध्ये सात सर्कल, मोफत ऑनलाइन कोर्स, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, मोफत हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक यांचाही समावेश आहे.
WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट
एअरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा 599 रुपये किमतीचा नेक्स्ट प्लॅन 28 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा ऑफर करतो. डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल आणि प्राइम व्हिडीओ मोबाइल व्हर्जन यांचा बेनिफिटमध्ये समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधादेखील यात मिळते. याशिवाय अपोलो 24 प्लॅनचे अतिरिक्त फायदे यामध्ये मिळतात. यात सात सर्कल, मोफत ऑनलाइन कोर्स, मोफत हॅलो ट्यून, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि विंक म्युझिक (Wynk Music) यांचाही यात समावेश होतो.
व्होडाफोन आयडिया 699 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाचा 699 रुपयांचा प्लॅन 54 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा, 100 एसएमएस, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. इतर बेनिफिटमध्ये वीकेंड डेटा रोल ओव्हर, बिंज ऑल नाइट (Binge All Night) आणि डेटा डिलाइट्स यांचा समावेश आहे.
व्होडाफोन आयडियाचा 901 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाच्या या नेक्स्ट प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा, 100 एसएमएस, व्हीआय मूव्ही अँड ओरिजनल (Vi Movies and Originals), लाइव्ह टीव्ही, न्यूज अशा बऱ्याच सुविधा मिळतात. अतिरिक्त बेनिफिटमध्ये डिस्ने + हॉटस्टारची 1 वर्षाची मेंबरशिप, कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता दरमहा 2 जीबी पर्यंत बॅकअप डेटा, वीकेंड डेटा रोल ओव्हर, रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बिंज ऑल नाइट सुविधा मिळते.
प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर कमी किमतीत बेस्ट बेनिफिट्स देणारे प्लॅन्स आवडत आहेत. ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासााठी हे प्लॅन नक्कीच उपयोगी ठरू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel, Reliance Jio, Smart phone, Vodafone idea tariff plan