Home /News /technology /

Jio चा धमाकेदार प्लॅन, 740 GB डेटासोबत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

Jio चा धमाकेदार प्लॅन, 740 GB डेटासोबत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

401 रुपये 28 दिवसांसाठी तर 2599 वर्षभराची वैधता ग्राहकांना मिळणार आहे.

    मुंबई, 07 जून : airtel आणि vodafone कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पुन्हा एकदा jio ने ग्राहकांसाठी धमाकेदार प्लॅन लाँच केला आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी खास दोन वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. यामध्ये 401 रुपये 28 दिवसांसाठी तर 2599 वर्षभराची वैधता ग्राहकांना मिळणार आहे. याआधी jioकडून 2399 रुपयांचा प्लॅन लाँच करण्यात आला होता. jio 401 recharge plan 401 रुपयांच्या प्लॅनची वैधता तुम्हाला 28 दिवस मिळणार आहे. यामध्ये jio ते jio अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3 जीबी डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत. तर ज्यादा 6 GB डेटा मिळणार असून त्यासोबत जिओ ते इतर नेटवर्कसाठी 1 हजार मिनिटं मिळणार आहेत याची वैधता एकूण 28 दिवसांसाठी असणार आहे. जर ग्राहकांनी हा रिचार्ज केला तर त्यांना डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीसाठी 1 वर्षासाठी 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये विनामूल्य सदस्यता मिळेल. हे वाचा-कपडे असो वा कोणतीही वस्तू 'या' कपाटात ठेवताच व्हायरसमुक्त होणार jio 2,599 recharge plan जिओने वर्षभरासाठी 2, 599 रुपयांचा रिचार्जमध्ये 740 GB डेटा मिळणार आहे. ग्राहकांना रोज 2 GB 4 जी डेटा मिळणार आहे. याशिवाय 10 GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. दररोजची डेटाची मर्यादा संपल्यानंतर 64 केबीपीएस वेग केला जाईल . या पॅकची वैधता 365 दिवस आहे. या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा तर जिओ ते इतर नेटवर्कसाठी 12 हजार मिनिटं ग्राहकांना मिळणार आहेत. रोज 100 SMS फ्री असतील. ग्राहकांना Jio अॅप्सचे विनामूल्य अ‍ॅक्सिस मिळतील. याशिवाय 399 रुपयांत किंमतीची डिस्ने + हॉटस्टार सदस्यताही या पॅकमध्ये 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. हे वाचा-कस्टमर केअर अधिकारी बनून लंपास केले 9 लाख, SIM द्वारे तुमचीही होऊ शकते फसवणूक हे वाचा-WhatsApp वर एकाचवेळी करता येईल 50 जणांना Video Call, वाचा काय आहे नवीन फीचर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या