Home /News /technology /

Jio युजर्सला लवकरच मिळणार 5G सुविधा, वाचा काय आहे प्लॅन

Jio युजर्सला लवकरच मिळणार 5G सुविधा, वाचा काय आहे प्लॅन

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने (Jio) देशातील 1000 लहान-मोठ्या शहरांत 5G नेटवर्क कव्हरेजसाठी (5G Network Coverage) पायाभूत सुविधा उभारण्याची योजना आखली आहे.

  नवी दिल्ली, 23 जानेवारी : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने (Jio) देशातील 1000 लहान-मोठ्या शहरांत 5G नेटवर्क कव्हरेजसाठी (5G Network Coverage) पायाभूत सुविधा उभारण्याची योजना आखली आहे. तसंच जिओकडून आपल्या फायबर क्षमतेच्या विस्तारासह पायलट योजनादेखील राबवली जात आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे (Reliance Jio Infocom) अध्यक्ष किरण थॉमस यांनी भारतात 5G सेवा देण्यासाठी संबंधित तयारीचा तपशील देताना सांगितलं, की कंपनीने याच्या यशस्वी ऑपरेशनसाठी अनेक टीम तयार केल्या आहेत. थॉमस यांनी पुढे माहिती देताना म्हटलं, की देशभरात जवळपास 1000 शहरांत 5G कव्हरेजची योजना तयार करण्यात आली आहे. Jio आपल्या 5G नेटवर्कवर हेल्थकेअर आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनसारख्या प्रगत क्षेत्रांमध्येदेखील चाचण्या घेत आहे. जिओ देशातील अनेक शहरांत 5G नेटवर्कसाठी पायलट प्रोजेक्ट चालवत आहे. त्याशिवाय 5G सेवा सुरू करण्यासाठी नेटवर्कची ब्लू प्रिंटही तयार केली जात आहे. 5G साठी अतिशय प्रगत नेटवर्क नियोजन तंत्राची आवश्यकता आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नेटवर्कची ब्लू प्रिंट बनवत आहोत, असंही ते म्हणाले. हे वाचा - CoWIN Portal मध्ये मोठे बदल, आता एकाच नंबरवर इतक्या लोकांना करता येईल लसीकरण! रिलायन्स जिओने (Reliance Jio) 5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स (Indigenously Developed Equipment) आणि टेक्नोलॉजीचा वापर केला असल्याची माहिती आहे.

  हे वाचा - Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

  दरम्यान, देशातील अनेक शहरांत कंपनीने 5G ट्रायल सुरू केलं आहे. याआधी Airtel आणि Jio नेही 5G ट्रायल सुरू केलं होतं. Airtel ने Ericson सह पार्टनरशिप करुन गुरुग्राममध्ये 5G ट्रायल सुरू केलं होतं. Airtel ला दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये 5G ट्रायलसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet

  पुढील बातम्या