मुंबई 13 जून: जगात मंदीचं वातावरण आहे आणि भारतात लॉकडाऊनमुळे अर्थचक्र संथ झालं आहे. असं वातावरण असताना देशातली क्रमांक एकची डिजिटल कंपनी असलेल्या Jioने नवा विक्रम केला आहे. Jioमध्ये सात आठवड्यांमध्ये तब्बल 10 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. ग्राहक सेवेशी संबंधित जगातल्या मोठ्या इक्विटी कंपन्यांपैकी एक असलेल्या L Catterto या दिग्गज कंपनीने Jio Platformsमध्ये 1,894.50 कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे L Cattertoला 0.39 टक्के Stake मिळणार आहेत.
या दहा कंपन्यांना जीओमधले 22.38 टक्के Stake मिळणार आहेत. तर जीओत आत्तापर्यंत 104,326.65 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीमुळे जीओच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे.
L Catterto या कंपनीने जगभरातल्या 200 कंझ्युमर्स ब्रॅड्समध्ये गुंतवणूक केली आहे. TPG या कंपनीने गुंतवणूक केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये L Cattertoने जीओत गुंतवणूक केली आहे.
या आधी काही वेळापूर्वीच TPG या कंपनीने Jio Platforms मध्ये 4,546.80 कोटींची गुंतवणूक केली होती. त्या मोबदल्यात कंपनीला Jioमध्ये 0.93 टक्के stake मिळणार आहेत. Jioमध्ये गुंतवणूक करणारी TPG ही नववी कंपनी होती. तर गेल्या सात आठवड्यांमध्ये जीओत तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.
हे वाचा - Jio मध्ये गुंतवणूकीचा ओघ सुरूच, Silver Lakने दुसऱ्यांदा गुंतवले 4,546 कोटी
जगभरातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक कंपनीने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी घेत 43,574 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. फेसबुकनं व्हॉट्सअॅप खरेदी केल्यानंतर सर्वात मोठी नेटवर्क म्हणून ओळखलं जात आहे.
हे वाचा - Jio चा धमाकेदार प्लॅन, 740 GB डेटासोबत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग
फेसबुक आणि जिओमध्ये झालेल्या या करारामुळे भारतात टेलिकॉम आणि डिजिटल मीडियासाठी तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मार्क झुकनबर्ग यांनी व्यक्त केला होता.
रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relince jio