Home /News /technology /

Jio मध्ये गुंतवणूकीचा ओघ सुरूच, Silver Lakने दुसऱ्यांदा गुंतवले 4,546 कोटी

Jio मध्ये गुंतवणूकीचा ओघ सुरूच, Silver Lakने दुसऱ्यांदा गुंतवले 4,546 कोटी

जगातली आघाडीची गुंतवणूक टेक कंपनी असलेल्या सिल्वर लेकने या आधी 4 मे रोजी Jioमध्ये 5,655.75 कोटींची गुंतवणूक केली होती.

    मुंबई 5 जून: डिजिटल क्षेत्रात सर्व जगात आपला ठसा उमटविणाऱ्या Jio मध्ये गुंतवणूकीचा ओघ अजुनही सुरूच आहे. Silver Lak आणि त्यांच्या इतर गुंतवणूकदारांनी Jioमध्ये आणखी 4,546 कोटींची गुंतवणूक केली आहे. Jioमध्ये गेल्या 24तासांमध्ये झालेली ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. या आधीही Silver Lak कंपनीने Jioमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. 4 जूनलाच अबुधाबीच्या Mubadala Investment Companyने Jioमध्ये 9,093 कोटींची गुंतवणूक केली होती. जगभरातल्या अनेक दिग्गज डिजिटल कंपन्यांनी स्वारस्य दाखविल्याने Jioमध्ये आत्तापर्यंत तब्बल 92,202.15 कोटींची गुंतवणूक आली आहे. जगातली आघाडीची गुंतवणूक टेक कंपनी असलेल्या सिल्व्हर लेकने या आधी 4 मे रोजी Jioमध्ये 5,655.75 कोटींची गुंतवणूक केली होती. सिल्वर लेक फर्म ही टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली फर्म आहे. जगभरात सुमारे 43 अरब डॉलर्सची संपत्ती असून जवळपास जवळपास 100 गुंतवणूकी आणि ऑपरेटिंग व्यावसायिकांची टीम आहे. याआधी, सिल्व्हर लेकने अलिबाबा ग्रूप, एअरबीएनबी, डेल, दीदी चकिंग, हायला मोबाइल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटरमध्येही गुंतवणूक केली आहे. रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Reliance

    पुढील बातम्या