मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

10 सप्टेंबर गणेश चतुर्थीदिवशी लाँच होणार Google आणि Jio यांचा 5G Smartphone

10 सप्टेंबर गणेश चतुर्थीदिवशी लाँच होणार Google आणि Jio यांचा 5G Smartphone

10. जिओ होणार जगातली दोन नंबरची सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी, अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये केली. देशात सध्या जिओचे 40 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत

10. जिओ होणार जगातली दोन नंबरची सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी, अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये केली. देशात सध्या जिओचे 40 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत

रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी सुरू झाली आहे. दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Video Aids) माध्यमांमधून ही सभा पार पडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधत आहेत. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच या सभेत त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहे.

(वाचा - Reliance AGM 2021: कोरोना काळात रिलायन्सचे 5 मिशन, COVID विरोधात असा दिला लढा)

रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली आहे. येत्या गणेश चतुर्थीला 10 सप्टेंबर रोजी हा फोन लाँच होणार आहे. हा फोन जिओ आणि गुगलने (google) मिळून डेव्हलप केला आहे. हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचं सांगण्यात आलं आहे. या फोनमध्ये कस्टम अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम दिलं जाणार आहे. त्यानंतर ते अँड्रॉईड वन सोबत येऊ शकतं. हे ऑपरेटिंग सिस्टम एन्ट्री लेवल स्मार्टफोन्ससाठी असतं.

डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ चालविणार्‍या नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टच्या नियंत्रणाखाली आहेत,  याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.

First published:

Tags: Reliance Industries, Reliance Industries Limited, Reliance Jio