नवी दिल्ली, 24 जून: संपूर्ण देश आज कोरोनाशी (Coronavirus in India) लढा देत आहे. अशावेळी देशभरातील काही महत्त्वाच्या संस्थांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्स फाउंडेशनकडूनही (Reliance Foundation) कोरोना काळात विशेष मदत करण्यात आली आहे. दरम्यान आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने पाच महत्त्वपूर्ण मिशन लाँच (Reliance Foundation launched five Missions to fight COVID-19) केले होते. त्याअंतर्गत रिलायन्सकडून मोठ्या प्रमाणात या काळात काम करण्यात आलं आहे.
जाणून घ्या काय आहेत रिलायन्स फाउंडेशनने लाँच केलेले कोव्हिड विरोधातील मिशन
पहिलं मिशन- मिशन ऑक्सिजन (Mission Oxygen)
दूसरं मिशन- मिशन कोव्हिड-इन्फ्रा (Mission Covid-Infra)
तिसरं मिशन- मिशन अन्नसेवा (Mission Anna Seva)
चौथं मिशन- मिशन एम्प्लॉयी केअर (Mission Employee Care)
पाचवं मिशन- मिशन व्हॅक्सिन सुरक्षा (Mission Vaccine Suraksha)
हे वाचा-रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा,LIVE पाहण्यासाठी इथे करा क्लिक
रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी सुरू झाली आहे. त्यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी याबाबत माहिती दिली. दुपारी दोन वाजल्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Video Aids) माध्यमांमधून ही सभा पार पडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला,
कोरोना काळात जीव गमावणाऱ्यांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुकेश अंबानी असं म्हणाले की कोरोना काळा रिलायन्स चांगलं प्रदर्शन करत आहे.
डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ चालविणार्या नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टच्या नियंत्रणाखाली आहेत, याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani, Nita ambani, Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited