Home /News /technology /

Jio, Vodafone-Idea, Airtel चे बेस्ट प्लॅन, दररोज 2 GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio, Vodafone-Idea, Airtel चे बेस्ट प्लॅन, दररोज 2 GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

दररोज 2 जीबी डेटाची ऑफरही देत आहेत. व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेलचे यासाठी खास प्लॅन आहेत.

    सध्या एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना थकबाकी लवकर भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कंपन्या दरात वाढ करू शकतात. सध्या दररोज दीड जीबी डेटा कंपन्यांकडून दिला जातो. यापेक्षा जास्त डेटासाठी दररोज 2 जीबी डेटाची ऑफरही देत आहेत. व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेलचे यासाठी खास प्लॅन आहेत. रिलायन्स जिओचा 249 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या मुदतीसाठी आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसेच जिओ टू जिओ अनलिमिटेड तर इतर नेटवर्कसाठी 1 हजार मिनिटे कॉलिंग मिळते. याशिवाय 444 रुपयांचा प्लॅनही आहे. याची वैधता 56 दिवस असून दररोज 2 जीबी इंटरनेट, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2 हजार मिनिटे फ्री मिळतात. दोन्ही पॅकसोबत जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एअरटेल युजर्सना दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. त्यासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच प्रीमियम अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत असणार आहे. याची वैधता 28 दिवसांसाठी असेल. त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी एअरटेलचा 698 रुपयांचा प्लॅन आहे. दररोज 2 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. याची वैधता 84 दिवसांसाठी असणार आहे. वाचा : Vodafone आणि Airtelनं लाँच केला 19 रुपयांचा प्लान, कोणता आहे सर्वात बेस्ट इंटरनेट डेटा आणि मोफत कॉलिंगसाठी आयडियाने 299 रुपयांचा प्लॅन दिला आहे. 28 दिवसांसाठीच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएससुद्धा मिळतात. याच सुविधा जास्त कालावधीसाठी म्हणजेच 56 दिवसांसाठी मिळतात. यासाठी व्होडाफोन आयडियाने 449 रुपयांचा प्लॅन दिला आहे. तसेच 84 दिवसांसाठी 699 रुपयांचाही प्लॅन आहे. वाचा : 1.5 GB विसरा आता दररोज 5 GB फ्री इंटरनेट डेटा, असा आहे प्लॅन
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Airtel, Vodafone

    पुढील बातम्या