नवी दिल्ली,28 जानेवारी: सध्या अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून (Work From Home) ऑनलाइन काम (Online Work) करण्यास सांगत आहेत. त्याशिवाय अनेकांच्या घरी मुलांच्या शाळा, क्लासही ऑनलाइन सुरू आहेत. सर्वांनाच स्वतंत्र वायफाय सुविधा घेणं शक्य नसतं, त्यामुळे मोबाईल डेटाचा वापर वाढला आहे. डेटाची (Data) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसंच घरून काम करत असताना अचानक दररोजचा डेटा संपला तर कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या नवनवे डेटा प्लॅन्स आणत आहेत. त्याचबरोबर या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांना परवडेल असा एक अभिनव उपाय मोबाईल सेवा प्रदाता कंपन्यांनी आणला आहे तो म्हणजे डेटा व्हाउचर्सचा (Data Vouchers). या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी डेटाची सर्वाधिक गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी फक्त डेटा देणारी फोर जी डेटा व्हाउचर्स बाजारात आणली आहेत. यामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल(Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्यांनी आघाडी घेतली असून, त्यांनी अत्यंत स्वस्त किमतीत ही व्हाउचर्स उपलब्ध केली आहेत.
रिलायन्स जिओचे फोर जी डेटा व्हाउचर अवघ्या 11 रुपयांत, व्होडाफोन आयडियाचे 16 रुपयात तर एअरटेलचे ४८ रुपयांत व्हाउचर उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओ व्हाउचर : रिलायन्स जिओच्या फोर जी डेटा व्हाउचरची किंमत फक्त 11 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटा मिळतो. यामध्ये व्हॅलिडिटीची अट नाही म्हणजे कितीही दिवस वापरू शकता, तसंच व्हॉईसकॉलिंगची सुविधा नाही. एअरटेल व्हाउचर : एअरटेलच्या व्हाउचरची किंमत 48 रुपयांपासून सुरू होते. यात ग्राहकांना 3 जीबी डेटा मिळतो. 28 दिवसांच्या आत कधीही युजर हा डेटा वापरू शकतात. यामध्येही व्हॉईसकॉलिंगची सुविधा नाही. व्होडाफोन आयडिया व्हाउचर : व्होडाफोन आयडियाच्या सर्वात स्वस्त डेटा व्हाउचरची किंमत 16 रुपये आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना एक जीबी डेटा देते. यामध्येही व्हॉईसकॉलिंगची सुविधा नाही. हे देखील वाचा - तरुणांसाठी खूशखबर! 2021 मध्ये नोकरीच्या अनेक संधी, या कंपन्यांमध्ये होणार मोठी भरती आपण घरातून ऑफिसचं काम करत आहात आणि अचानक तुमचा डेटा संपला तर मोठी अडचण उद्भवू शकते. अशावेळी हे अगदी किफायतशीर दरातील डेटा व्हाउचर्स अत्यंत उपयुक्त ठरत असून, अगदी कमी खर्चात डेटाची अडचण दूर होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. **https://hindi.news****18.****com/news/tech/reliance-jio-4g-voucher-airtel-4g-voucher-vodafone-idea-4g-voucher-know-4g-plans-starting-****11-****rupees-aaaq-****3434143.**html