मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

खरं की खोटं! रेकॉर्ड Vaccination झाल्याने मोदी सरकार नागरिकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?

खरं की खोटं! रेकॉर्ड Vaccination झाल्याने मोदी सरकार नागरिकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?

WhatsApp Message द्वारे दावा केला जात आहे, की देशात रेकॉर्ड कोरोना वॅक्सिनेशन झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे. परंतु PIBने याबाबत अलर्ट केलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : कोरोना संकट काळात अनेकदा कधी ऑक्सिजनची कमी, तर कधी रेमडेसिविरसारख्या औषधांच्या उपलब्धतेबाबत खोटे, बनावट दावे केले गेले. त्यानंतर वॅक्सिनेशनबाबत खोटे दावे करण्यात आले आहेत. आता एका WhatsApp Message द्वारे दावा केला जात आहे, की देशात रेकॉर्ड कोरोना वॅक्सिनेशन झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे. परंतु प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत अलर्ट केलं आहे.

PIB Alert -

PIB कडून, WhatsApp मेसेजमध्ये सरकार एयरटेल (Airtel), जियो (Jio) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) युजर्सला 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्याच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचं समोर आलं आहे. PIB ने हा दावा पूर्णपणे खोटा आणि आधारहीन असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्याही युजरने या दाव्याच्या जाळ्यात अडकू नये, असं PIB कडून सांगण्यात आलं आहे.

तब्बल 7 तासांनी पुन्हा सुरू झालं WhatsApp, Facebook आणि Insta; मागितली माफी

कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. भारत सरकारच्या PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

काय आहे PIB?

PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

First published:

Tags: Fake news, Whatsapp