Home /News /viral /

कुठे जातो? काय करतो? बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी तरुणीने लढवली भलतीच शक्कल

कुठे जातो? काय करतो? बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी तरुणीने लढवली भलतीच शक्कल

मुलींच्या मनामध्ये (Girls Mind) काय सुरू आहे याचा ठाव खुद्द ब्रह्मदेवालाही लागू शकत नाही, असं अनेकदा गमतीनं म्हटलं जातं. पण, या गोष्टीमध्ये खरंच काही तथ्य असेल का? मुली किंवा महिलांच्या मनातील गोष्टी जाणून घेणं खरोखर कठीण आहे का? ह्युमन सायकॉलॉजीचा (Human Psychology) विचार केला तर ही गोष्ट एकदम खरी आहे. त्यांचा मूड क्षणात बदलू शकतो. वरकरणी त्यांचा समोरच्यावर कितीही विश्वास असल्याचं दिसत असलं तरी मनातून मात्र, त्या कायम चौकसपणे समोरच्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असतात.

पुढे वाचा ...
    मुंबई,19 मे-    मुलींच्या मनामध्ये (Girls Mind) काय सुरू आहे याचा ठाव खुद्द ब्रह्मदेवालाही लागू शकत नाही, असं अनेकदा गमतीनं म्हटलं जातं. पण, या गोष्टीमध्ये खरंच काही तथ्य असेल का? मुली किंवा महिलांच्या मनातील गोष्टी जाणून घेणं खरोखर कठीण आहे का? ह्युमन सायकॉलॉजीचा (Human Psychology) विचार केला तर ही गोष्ट एकदम खरी आहे. त्यांचा मूड क्षणात बदलू शकतो. वरकरणी त्यांचा समोरच्यावर कितीही विश्वास असल्याचं दिसत असलं तरी मनातून मात्र, त्या कायम चौकसपणे समोरच्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असतात. जे लोक रिलेशनशीपमध्ये (Relationship) आहेत त्यांना कदाचित या गोष्टीचा अनुभव आला असेल. रिलेशनशीपमध्ये असलेल्या मुली (Girls in Relationship) आपल्या बॉयफ्रेंडबाबत (Boyfriend) फारच पझेसिव्ह (Possessive) असतात. आपला बॉयफ्रेंड काय करतो, कुणाला भेटतो याची सर्व माहिती त्यांना पाहिजे असते. बॉयफ्रेंडनं स्वत:हून जरी ही माहिती त्यांना दिली नाही तरी त्या काहीनाकाही शक्कल लढवून त्याचा माग काढतातच. जेसिका शॉ (Jessica Shaw) नावाच्या मुलीने तर आपल्या बॉयफ्रेंडच्या नकळत लोकेशन ट्रेस (Location Trace) करण्याची किमया करून दाखवली आहे. विशेष म्हणजे याबाबत तिनं जाहीरपणे कबुलीदेखील दिली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जेसिका शॉ नावाच्या मुलीनं टिकटॉकवर (TikTok) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने खुलासा केला आहे की, ती आपल्या बॉयफ्रेंडचं लोकेशन कसं ट्रेस करत आहे. 'जेव्हा माझा बॉयफ्रेंड त्याचं लोकेशन शेअर करण्यास नकार देतो तेव्हा मला त्याचा पत्ता कसा समजतो?' असा प्रश्न विचारून तिनं समोरच्याच्या नकळत त्याचं लोकेशन कसं ट्रेस करायचं हे आपल्या फॅन्सना सांगितलं आहे. जेसिकानं आपल्या या व्हिडिओमध्ये मोबाईल सेटिंग्जमध्ये कशाप्रकारे बदल करायचे याचीदेखील माहिती दिली आहे. बॉयफ्रेंडच्या फोनमधील सेटिंग्ज (Settings) ऑप्शनमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनवर (Privacy) क्लिक करावं लागेल. लोकेशन सर्व्हिस टॅबमध्ये (Location Service Tab) तुम्ही काही लोकेशन्सवर क्लिक करू शकता. त्यानंतर तिथे बॉयफ्रेंडनं सर्वाधिक भेट दिलेली ठिकाणं दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही तो कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी त्या ठिकाणी होता हे समजू शकतं. 'जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल तर तुम्ही अशाप्रकारे त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता', असं जेसिका म्हणाली. 'जास्त विचार करण्याची गरज नाही...मला माहिती आहे मी वेडेपणा करत आहे,' असं कॅप्शन जेसिकानं आपल्या व्हिडिओला दिलं आहे. यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिलेशनशिपमध्ये हा विचित्र प्रकार नाही केला पाहिजे, असा सल्ला अनेकांनी जेसिकाला दिला आहे. एका यूजरने कमेंट केली आहे, 'जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असं काही करायचं असेल त्या व्यक्तीपासून वेगळं झालं पाहिजे.' आणखी एका यूजरनं जेसिकाला सल्ला दिला आहे की, 'जर पार्टनर हुशार असेल तर तो काही लोकेशनचे डिटेल्स डिलीटही करू शकतो.'जेसिकाचा हा व्हिडिओ चार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
    First published:

    Tags: Tik tok, Viral news

    पुढील बातम्या