जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / विना चार्जर iPhone विक्री करणं पडलं महागात, ग्राहकाला द्यावे लागणार 82 हजार रुपये; काय आहे प्रकरण

विना चार्जर iPhone विक्री करणं पडलं महागात, ग्राहकाला द्यावे लागणार 82 हजार रुपये; काय आहे प्रकरण

विना चार्जर iPhone विक्री करणं पडलं महागात, ग्राहकाला द्यावे लागणार 82 हजार रुपये; काय आहे प्रकरण

दोन वर्षांपूर्वी Apple ने प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडबाबत एक निर्णय घेतला होता. याअंतर्गत कंपनीने iPhone विक्री करताना त्यातून चार्जर हटवण्यात आलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : दोन वर्षांपूर्वी Apple ने प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडबाबत एक निर्णय घेतला होता. याअंतर्गत कंपनीने iPhone विक्री करताना त्यातून चार्जर हटवण्यात आलं होतं. कोणीही ज्यावेळी iPhone खरेदी करतं, त्याला चार्जर वेगळं घ्यावं लागतं. कंपनीला आपल्या या निर्णयावर अनेक युजर्सची नाराजी सहज करावी लागली आहे. पण याच निर्णयावर कायम राहत कंपनीने यात कोणताही बदल केला नाही. याबाबत एक प्रकरण नुकतंच समोर आलं असून Apple ला आपल्या ग्राहकाला तब्बल 82 हजार रुपये अधिक द्यावे लागले. ब्राझीलमध्ये एका न्यायाधिशाने स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple ला ऑर्डर दिली, की त्यांना ब्राझीलच्या आपल्या ग्राहकाला 1000 हून अधिक डॉलर्स द्यावे लागतील, कारण त्यांनी विना चार्जर आयफोन विक्री केला होता. यापूर्वीही Apple ला याच कारणामुळे ग्राहकाला पैसे द्यावे लागले होते. Techmundo च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलच्या 6th Civil Court of Goiânia चे न्यायाधिश Vanderlei Caires Pinheiro यांनी Apple कंपनीबाबत एक निर्णय दिला. iPhone विना चार्जर विक्री करणं हे त्यांच्या देशाच्या कनज्यूमर कायद्याचं उल्लंघन आहे. हेच कारण देत Apple ला त्याच्या ग्राहकांना $,1075 अर्थात भारतीय रुपयानुसार जवळपास 82,139 रुपये देण्याचं सांगितलं आहे. याबाबत Apple ने आपली बाजू मांडत सांगितलं, की अधिकतर iPhone युजर्सकडे आधीपासूनच चार्जर असतं. अशात प्रत्येक नव्या iPhone सह चार्जर विक्री करणं योग्य नाही. तसंच हे पर्यावरणासाठीही हानिकारक ठरू शकतं. चार्जर्स iPhone सह विक्री न केल्याने केवळ ई-वेस्ट वाचवत नाही, तर iPhone डब्ब्याचे फुटप्रिंटही कमी करण्यास मदत होते. तसंच यामुळे कंपनीची पैशांचीही मोठी बचत होते.

हे वाचा -  UPI Payment चा वापर करता? चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट

सध्या ब्राझीलच्या या प्रकरणावर Apple ने कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच ते ग्राहकाला पैसे देणार की नाही याबाबतही सांगण्यात आलेलं नाही. ब्राझील कोर्टाकडूनही याबाबत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात