अमेरिका, लंडनमध्ये Apple चे 50 हून अधिक Stores बंद; हे आहे कारण

अ‍ॅपलने अमेरिकेतील अनेक स्टोर्ससह कॅलिफोर्नियातील सर्व रिटेल स्टोर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहेत. त्याशिवाय मॅक्सिकोतील दोन स्टोर्स, ब्राझिलमधील दोन आणि यूकेतील 16 स्टोर्स बंद करण्यात येणार आहे.

अ‍ॅपलने अमेरिकेतील अनेक स्टोर्ससह कॅलिफोर्नियातील सर्व रिटेल स्टोर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहेत. त्याशिवाय मॅक्सिकोतील दोन स्टोर्स, ब्राझिलमधील दोन आणि यूकेतील 16 स्टोर्स बंद करण्यात येणार आहे.

 • Share this:
  सॅन फ्रॅन्सिस्को, 20 डिसेंबर : ख्रिसमसच्या अगदी काही दिवस आधी, स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple आपले 50 हून अधिक Apple stores बंद केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि लंडनमधील आपले आउटलेट्स ताप्तुरते बंद (Apple Stores Closed) करण्याचा निर्णय घेतला आहे. Apple Stores बंद करण्याचं कारण - रिपोर्ट्सनुसार, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वाढत्या कोरोना व्हायरस रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. Apple ने अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सर्व 53 स्टोर्स आणि लंडनमधील 12 हून अधिक स्टोर्स ताप्तुरते बंद केले आहेत.

  (वाचा - नवा मोबाईल घ्यायचाय?10 हजारांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन;मिळतील आकर्षक फीचर्स)

  जगभरातील सर्वाधित कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत अमेरिका सर्वात प्रभावित देश आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगभरात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 18 टक्के मृत्यू केवळ अमेरिकेत झाले आहेत.

  (वाचा - कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय)

  9 टू 5 मॅकच्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने अमेरिकेतील अनेक स्टोर्ससह कॅलिफोर्नियातील सर्व रिटेल स्टोर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहेत. त्याशिवाय मॅक्सिकोतील दोन स्टोर्स, ब्राझिलमधील दोन आणि यूकेतील 16 स्टोर्स बंद करण्यात येणार आहे.

  (वाचा - Oppo च्या या स्मार्टफोनची जबरदस्त धूम;10 मिनिटांत 100 कोटींहून अधिक फोनची विक्री)

  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कॅलिफोर्निया राज्याने सॅन फ्रॅन्सिस्को भागात एमर्जेंसी अलर्ट जारी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अ‍ॅपलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: