मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Internet Speed: स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्लो झालंय? 'या' ट्रिक्सचा वापर करून वाढवा स्पीड

Internet Speed: स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्लो झालंय? 'या' ट्रिक्सचा वापर करून वाढवा स्पीड

Internet Speed: स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्लो झालंय? 'या' ट्रिक्सचा वापर करून वाढवा स्पीड

Internet Speed: स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्लो झालंय? 'या' ट्रिक्सचा वापर करून वाढवा स्पीड

Internet Speed Tips: बऱ्याचवेळा डाटा स्पीड अपेक्षित मिळत नसल्याची तक्रार युजर्स करतात. डाटा स्पीड स्लो असेल तर अ‍ॅप्स वापरण्यात किंवा फाईल्स डाउनलोड, अपलोड करण्यास जास्त वेळ लागतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 सप्टेंबर: स्मार्टफोन आणि त्या माध्यमातून इंटरनेट वापराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनवरून विविध प्रकारची अ‍ॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट गरजेचं असतं. बऱ्याचवेळा डाटा स्पीड अपेक्षित मिळत नसल्याची तक्रार युजर्स करतात. डाटा स्पीड स्लो असेल तर अ‍ॅप्स वापरण्यात किंवा फाईल्स डाउनलोड, अपलोड करण्यास जास्त वेळ लागतो. यामुळे युजर्सना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. डाटा स्पीड बूस्ट करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा वापर तुम्ही करू शकता. या ट्रिक्स प्रामुख्याने सिम कार्ड, नेटवर्क ऑप्शन आणि एअर प्लेन मोडशी संबंधित आहेत. `एबीपी लाइव्ह`ने या विषयीची माहिती दिली आहे.

सध्याच्या काळात बहुतांश लोकांचं विश्व स्मार्टफोन आणि इंटरनेटविना अधुरं असतं. त्यातच जर स्मार्टफोनवरील इंटरनेटचा स्पीड कमी झाला तर युजर्सना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. जर तुमच्याही स्मार्टफोनमधील डाटा स्पीड स्लो झाला तर तो बूस्ट करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. जर तुमच्या स्मार्टफोनवरील डाटा स्पीड कमी झाला असेल तर तो नक्कीच वाढवता येतो. यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधलं सिम कार्ड तपासावं. सिम कार्डवर धूळ किंवा घाण साचली असेल तर त्यामुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी स्मार्टफोनच्या स्लॉटमधून सिम कार्ड बाहेर काढून स्वच्छ करावं. तसंच तुम्ही ज्या सिम कार्डच्या माध्यमातून डाटा वापरता ते सिम कार्ड स्मार्टफोनमधल्या इंटरनेटसाठी असलेल्या 1 नंबरच्या स्लॉटमध्ये टाकावं. यामुळे डाटा स्पीडमध्ये नक्कीच फरक दिसून येईल.

हेही वाचा: Appleचा 'मेड इन इंडिया' iPhone 14 लवकरच येणार, जगभरात होणार निर्यात

जर तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड स्लो झाला असेल तर तो वाढवण्यासाठी आणखी एक सोपी ट्रिक तुम्ही वापरू शकता. तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधला एअर प्लेन मोड चालू करावा लागेल. त्यानंतर काही वेळानं हा मोड ऑफ करावा. यामुळे तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढल्याचं दिसून येईल.

स्मार्टफोनमधील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही सेटिंग्जमध्ये काही बदल करू शकता. तुमच्या फोनमध्ये मोबाईल डाटासाठी नेटवर्क पर्याय उपलब्ध असतात. अर्थात, हे पर्याय तुमच्या सिमवर अवलंबून असतात. काहीवेळा 4G नेटवर्क असतानाही सिग्नल चांगला नसतो. अशावेळी फोनच्या सेटिंग्ज ऑप्शनमध्ये मोबाईल डाटा ऑप्शनवर क्लिक करावं. त्यानंतर 2G/3G/4G Auto ऑप्शनवर स्विच करावं. यामुळे तुमच्या फोनमधील इंटरनेटचा स्पीड नक्कीच वाढू शकेल. तुम्हाला कामाच्यावेळी योग्य डाटा स्पीड मिळत नसेल तर तुम्ही वरीलपैकी कोणतीही ट्रिक वापरून पाहू शकता. यामुळे डाटा स्पीडमध्ये सुधारणा होईल.

First published:

Tags: High speed internet, Internet, Smartphone