मुंबई, 27 सप्टेंबर: अॅपलनं (Apple) भारतात आपल्या नवीन आयफोन्सचं (iPhones) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक टेक टायटननं चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजारपेठेत उत्पादनासाठी निर्णय घेतला आहे. 2017 पासून Apple चे आयफोन्स भारतात तयार केले जात आहेत. आतापर्यंत Apple च्या SE व्हेरियंटचे iPhones देशात तयार होत आहेत. पण आता अॅपलनं भारतात उत्पादित केलेले अत्याधुनिक आयफोन मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता देशात iPhone SE, iPhone 12, iPhone 13 तसेच iPhone 14 सीरीजचे उत्पादन सुरू होणार आहे. मेक इन इंडियामुळे देशांतर्गत कॅस्टरपर्यंत पोहोचणे सोपं होईल: अलीकडेच अॅपलनं iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या मालिकेत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्स आहेत. आयफोन 14 च्या या सीरिजमध्ये उत्तम कॅमेरा, पॉवरफुल सेन्सर आणि सॅटेलाइट मेसेजिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या सॅटेलाइट मेसेजिंग फीचरद्वारे युजर्स आपत्कालीन परिस्थितीत संदेश पाठवू शकतात. येत्या काही दिवसांत मेक-इन-इंडिया अंतर्गत बनवलेल्या आयफोन 14 वर स्थानिक वापरकर्त्यांचा प्रवेश सुलभ होईल. भारतात बनवलेले हे आयफोन देशांतर्गत बाजारात तसेच जगभरात निर्यात केले जातील. हेही वाचा: Tata लव्हर्सना लॉटरी! ‘या’ 5 कारवर मिळतोय तगडा डिस्काउंट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी चेन्नई येथे असलेल्या प्लांटमध्ये होणार उत्पादन: आयफोन 14 चे उत्पादन चेन्नईच्या बाहेरील भागात फॉक्सकॉनच्या श्रीपेरुम्बुदुर प्लांटमध्ये केले जाईल. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी कंत्राटी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक आणि आघाडीची आयफोन असेंबलर आहे. Apple ने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “आम्ही भारतात iPhone 14 चे उत्पादन करण्यास उत्सुक आहोत. नवीन आयफोन 14 लाइनअप नवीन तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण सुरक्षा क्षमतांनी सुसज्ज आहे.
7 सप्टेंबर रोजी आयफोन 14 लॉन्च करण्यात आला होता, जो भारतासह जगभरातील बाजारपेठेतील ग्राहकांसाठी 16 सप्टेंबरपासून उपलब्ध आहे. अॅपल 20 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये अॅपलनं देशात त्यांचे ऑनलाइन स्टोअर लॉन्च केले आणि लवकरच कंपनी येथे त्यांचे रिटेल स्टोअर सुरू करण्याचा विचार करत आहे.