जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / International Women’s Day 2022: महिलांना गिफ्ट करू शकता हे Top 5 Gadgets, ठरतील फायदेशीर

International Women’s Day 2022: महिलांना गिफ्ट करू शकता हे Top 5 Gadgets, ठरतील फायदेशीर

International Women’s Day 2022: महिलांना गिफ्ट करू शकता हे Top 5 Gadgets, ठरतील फायदेशीर

अशी अनेक गॅझेट्स आहेत जी महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी गॅझेट्स नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो.

    नवी दिल्ली, 7 मार्च : पैसे खर्च करण्यायोग्य गिफ्ट कॅटेगरीमध्ये (Gift Categories) टेक गॅझेट्सचा (Tech Gadgets) समावेश होतो. गॅझेट्स ही अशी एक कॅटेगरी आहे ज्यामध्ये लोकांच्या मोठ्या गटाला आकर्षित करण्याची क्षमता आहे. त्याला मेल-फीमेल कॅटेगरीचंदेखील फारसं बंधन नाही. अशी अनेक गॅझेट्स आहेत जी महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी गॅझेट्स नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day 2022) अवघ्या काही तासांवर (8 मार्च) येऊन ठेपला आहे. वुमन्स डेच्या निमित्तानं आपल्याला आयुष्यातील आवडत्या आणि महत्त्वाच्या स्त्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. या दिवशी तुमच्या प्रेयसीला, आईला किंवा कोणत्याही आवडत्या स्त्रीला कार्ड (Card) किंवा फुलांचा गुच्छ (Bouquet of Flowers) देण्याऐवजी किंवा सर्व टिपिकल गिप्ट्सपेक्षा गॅझेट्स हा अधिक चांगला आणि व्यावहारिक पर्याय वाटतो. फिटनेस ट्रॅकर (Fitness Tracker) जगभरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सध्या प्रत्येकजण आरोग्याबाबत अधिक जागरूक (Health-Conscious) झाला आहे. एक चांगला फिटनेस बँड किंवा ट्रॅकर एखाद्याच्या आरोग्याशी संबंधित घटकांची नोंद ठेवतो. त्यामुळे अशी उपयुक्त वस्तू गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. रूम ह्युमिडिफायर (Room Humidifier) स्त्रिया आपल्या त्वचेच्या आरोग्याबाबत (Skin Health) खूपच जागरूक असतात. बहुतेक स्त्रिया त्यांचा चेहरा नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी विशिष्ट स्किनकेअर रुटीनचं (Skincare Routine) पालन करतात. ह्युमिडिफायर (Humidifier) त्वचेला पुरेशा प्रमाणात आर्द्रता (Moisture) प्रदान करून पोषण देण्यास मदत करतं. त्यामुळे वुमन्स डेनिमित्त तुम्ही ह्युमिडिफायर गिफ्ट देऊ शकता. शिवाय हे गिफ्ट तुम्हाला परवडणारं ठरेल कारण ह्युमिडिफायर स्वस्त आहेत.

    हे वाचा -  Android युजर्स सावधान, Google Play Storeवर मालवेयरचा धोका,बँकिंग डिटेल्स धोक्यात

    व्हिडिओ फ्रेम (Video Frame) - सध्याच्या टेक्नोसॅव्ही काळात फोटो फ्रेम्स गिफ्ट देणं आऊटडेटेड वाटू शकतं. त्याऐवजी डिजिटल व्हिडिओ फ्रेम (Digital Video Frame) हा चांगला पर्याय ठरू शकतो. या बॅटरी किंवा पॉवर-ऑपरेटेड फ्रेम्सच्या रुपात तुम्ही आयुष्यातील सर्वांत चांगल्या क्षणांचे फोटो एकत्र करून देऊ शकता. जीपीएस/ टाईल ट्रकर (GPS/Tile Tracker) - सध्याच्या धावपळीच्या डेली रुटिनमध्ये आपण किल्ल्या किंवा इतर गरजेच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे विसरून जातो. वर्किंग वुमनसाठी तर सर्व गोष्टी लक्षात ठेवणं म्हणजे तारेवरची कसरतच ठरते. अशा वेळी टाइल ट्रॅकर (Tile Tracker) हे सर्वांत चांगलं गिफ्ट ठरू शकतं. टाइल ट्रॅकरमुळे तिला बॅग किंवा मौल्यवान वस्तू सहज सापडतील. टाइल ट्रॅकर हे एक लहान डिव्हाइस आहे जे तुम्ही तुमच्या बॅग किंवा कारच्या किल्ल्यांना जोडू शकता आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशन वापरून त्याचं लोकेशन (Location) ट्रॅक करू शकता.

    हे वाचा -  Tips and Tricks: एखाद्याला ट्रॅक करायचं आहे? Google Maps असं सांगेल लोकेशन

    हेयर ड्रायर (Hair Dryer) - बहुतेक स्त्रियांसाठी, हेअर ड्रायर हे केवळ एक गॅझेट नसून एक गरज आहे. हे अतिशय उपयुक्त असल्यानं तुमच्या आयुष्यातील खास स्त्रीला भेट देऊ शकता. जर तुम्हाला बेसिक हेअर ड्रायर (Basic Hairdryer) भेट देणं खूपच कॉमन वाटत असेल तर तुम्ही काही टॉप-ऑफ-द-लाइन ड्रायर्सची निवड करू शकता. हे ड्रायर्स खूप पावरफुल आणि कार्यक्षमदेखील आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात