मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram च्या विविध पोस्ट एकत्र करता येतील डिलीट, तुम्हाला माहितेय का हे फीचर?

Instagram च्या विविध पोस्ट एकत्र करता येतील डिलीट, तुम्हाला माहितेय का हे फीचर?

इन्स्टाग्रामने (Instagram New Feature) युजर्सना पोस्ट, कमेंट आणि इतर प्लॅटफॉर्म अ‍ॅक्टिव्हीटी सहजपणे डिलीट (Instagram feature to easily delete) करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने नवीन फीचर आणलं आहे.

इन्स्टाग्रामने (Instagram New Feature) युजर्सना पोस्ट, कमेंट आणि इतर प्लॅटफॉर्म अ‍ॅक्टिव्हीटी सहजपणे डिलीट (Instagram feature to easily delete) करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने नवीन फीचर आणलं आहे.

इन्स्टाग्रामने (Instagram New Feature) युजर्सना पोस्ट, कमेंट आणि इतर प्लॅटफॉर्म अ‍ॅक्टिव्हीटी सहजपणे डिलीट (Instagram feature to easily delete) करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने नवीन फीचर आणलं आहे.

मुंबई, 15 फेब्रुवारी: इन्स्टाग्रामने (Instagram New Feature) युजर्सना पोस्ट, कमेंट आणि इतर प्लॅटफॉर्म अ‍ॅक्टिव्हीटी सहजपणे डिलीट (Instagram feature to easily delete) करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने नवीन फीचर आणलं आहे. 'सेफ डेज' उपक्रमाचा एक भाग म्हणून हे फीचर आणण्यात आलं आहे. ‘Your Activity’ नावाने हे फीचर इन्स्टाग्राममध्ये असून तुम्ही तेथूनच ते अ‍ॅक्सेस करू शकता. ते वापरून इन्स्टाग्राम यूजर्स आता पोस्ट, स्टोरीज, आयजीटीव्ही (IGTV) आणि रील्ससारखा कंटेंट हा बल्कमध्ये डिलीट किंवा अर्काइव्ह करू शकतात. यामुळे प्लॅटफॉर्मवर केलेल्या कमेंट्स, लाइक्स, स्टोरी स्टिकर रिअ‍ॅक्शन्स हे इन्स्टाग्रामवर एकाच ठिकाणाहून डिलीट करता येतील. एकाच वेळी इन्स्टाग्रामवरील अनेक पोस्ट डिलीट किंवा अर्काइव्ह कशा कराल - तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनवर, इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडा. - पेजच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या आयकॉनवर टॅप करून तुमच्या प्रोफाइलवर जा. - वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटवर टॅप करा. - Menu मध्ये जाऊन Activity ऑप्शनवर टॅप करा. - इतर ऑप्शन - फोटो आणि व्हिडीओवर टॅप करा हे वाचा-आता एका SMS ने PORT करा Mobile Number, पाहा सोपी प्रोसेस - Posts वर टॅप करा - तुम्ही तुमच्या सर्व पोस्ट इथे पाहू शकाल. सॉर्ट आणि फिल्टर ऑप्शनद्वारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पोस्टची क्रमवारी लावू शकता. - वरच्या उजव्या कोपर्‍यात सिलेक्ट ऑप्शनवर टॅप करा. - तुम्हाला ज्या पोस्ट डिलीट किंवा अर्काइव्ह करायच्या आहेत, त्यावर टॅप करा. - एकदा का तुम्ही पोस्ट निवडली की, त्यानंतर तुम्ही अर्काइव्ह किंवा डिलीट या ऑप्शनवर टॅप करा. इन्स्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी (Instagram Latest Update) सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. त्यामुळे इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे वाचा-Fake-बनावट सॉफ्टवेअरने सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच लोकप्रिय फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्सची संख्या खूप मोठी आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातदेखील इन्स्टाग्राम खूप लोकप्रिय आहे. रील्स फीचर रोल आउट केल्यानंतर अ‍ॅपची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. तुमचे इन्स्टाग्राम प्रोफाइल चांगले असेल व तुम्हाला अनेकजण फॉलो करत असतील, तर तुम्हाला याचा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी देखील होऊ शकतो. इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये चांगली माहिती दिल्याने इतर यूजर्स कनेक्ट होऊ शकतील. चांगला कंटेंट पोस्ट केल्यामुळे देखील तुमचे फॉलोअर्स वाढू शकतात. पण हे करीत असतानाच इन्स्टाग्राममध्ये येणाऱ्या नवनवीन फीचरची माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. कारण कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी सातत्याने वेगवेगळी फीचर आणत असते. या फीचरचा वापर केल्यास तुमचा इन्स्टाग्राम वापरण्याचा अनुभव अधिकच चांगला होऊ शकतो.
First published:

Tags: Instagram, Instagram post

पुढील बातम्या