नवी दिल्ली, 2 जुलै : गाडी चालवताना फोनवर बोलणं हे भारतात पहिल्यापासूनच बेकायदा आहे. आता केरळ राज्याने यापुढचं पाऊल टाकलं आहे. गाडी चालवत असताना हँड्स-फ्री उपकरणाचा (Handsfree Devices) वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जावी, असे आदेश केरळमधल्या पोलिसांनी (Kerala Police) दिले आहेत. 2019मध्ये या संदर्भातला कायदा मागे घेण्यात आला होता. तो पुन्हा लागू करण्याचं केरळ पोलिसांनी ठरवलं आहे. लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे लोकांची ये-जा, प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. वर्दळ वाढू लागली आहे. दुर्घटनाही वाढू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, केरळ राज्यातल्या पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
अलीकडच्या नव्या कार्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिंग इन्फोटेन्मेंट सिस्टीम्स (Infotainment System) असतात. त्यामुळे एखादा कारचालक फोनकॉलवर बोलतोय की नाही, हे ओळखणं पोलिसांना कठीण जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवातीला अवघड होणार आहे; मात्र मोटार वाहन विभागानेही सर्व चालकांना आवाहन केलं आहे, की वाहन चालवताना फोनकॉलवर बोलण्यासाठी ब्लूटूथ उपकरणाचा वापर करू नये.
मोटार वाहन अधिनियम 2019मधल्या केंद्रीय मोटार वाहन नियम 21(25)चा वापर करून 2019 साली मोटार वाहन विभागाने वाहनात ब्लूटूथ डिव्हाइसच्या (Bluetooth Device) कनेक्टिव्हिटीवर निर्बंध आणले होते; मात्र केरळ हायकोर्टात (Kerala Highcourt) अशा एका प्रकरणात सुनावलेला निकाल वेगळा होता. गाडी चालवताना फोन कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिस कारवाई करू शकत नाहीत. कारण गाडी चालवताना मोबाइल फोनच्या वापरावर निर्बंध घालण्याची तरतूद कायद्यात नाही, असं हायकोर्टाने म्हटलं होतं.
हे ही वाचा-
तुमची कार कमी मायलेज देतेय? पेट्रोलच्या वाढत्या किमतीदरम्यान फॉलो करा या टिप्स
आता केरळ पोलिस अधिनियमाच्या 118 (E) या कलमाचा वापर करून, वाहन चालवताना फोनकॉलवर बोलणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करू शकतात. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणं, नागरिकांचा जीव धोक्यात घालणं आणि सार्वजनिक सुरक्षा आदींचा 118 (E) मध्ये समावेश आहे.
ड्रायव्हिंग (Driving) करताना ब्लूटूथ किंवा हँड्सफ्री उपकरणांचा वापर करून फोनकॉलवर बोलणं (Attending a Phonecall while driving), म्हणजे आपलं ड्रायव्हिंगवरचं लक्ष कमी करून अन्य कोणत्या तरी गोष्टीकडे लक्ष देण्यासारखं आहे. ड्रायव्हिंगवरून लक्ष दुसरीकडे गेलं, तर दुर्घटना घडू शकते. अशा प्रकारचं ड्रायव्हिंग धोकादायक (Dangerous Driving) ठरू शकतं. म्हणूनच या नियमाची केरळमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.