मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /अवघ्या 10 मिनिटांत तयार पॅनकार्ड येईल हातात; जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया

अवघ्या 10 मिनिटांत तयार पॅनकार्ड येईल हातात; जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया

'Instant E PAN' वर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यानंतर 'New E PAN' वर क्लिक करावं लागेल. इथे तुमचा पॅन नंबर टाकावा लागेल. जर तुम्हाला पॅन नंबर आठवत नसेल, तर आधार नंबरही टाकता येतो.

'Instant E PAN' वर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यानंतर 'New E PAN' वर क्लिक करावं लागेल. इथे तुमचा पॅन नंबर टाकावा लागेल. जर तुम्हाला पॅन नंबर आठवत नसेल, तर आधार नंबरही टाकता येतो.

आता पॅनसाठी अर्ज करणं खूप सोपं झालं असून, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आहे, ते इन्स्टंट पॅन (instant Pan) किंवा ई-पॅनसाठी (E-Pan) ऑनलाइन अर्ज करू शकतात

  अनेक सरकारी कामांमध्ये, त्याचप्रमाणे बँकेतील कामं आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या (Investment) कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. तसंच ओळखीचा पुरावा म्हणूनदेखील काही ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक असतं. आधार कार्डप्रमाणे (Aadhaar Card) पॅन कार्डदेखील (Pan Card) अत्यावश्यक सरकारी दस्तऐवज आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे पॅन कार्ड असणं गरजेचं असतं; मात्र पॅन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतील अशी अनेकांची कल्पना असते. आता तुम्ही अगदी घरबसल्या ऑनलाइन (Online) पद्धतीने अवघ्या दहा मिनिटांत तुमचं पॅन कार्ड तयार करून घेऊ शकता. एवढंच नव्हे, तर पॅन कार्डचं व्हेरिफिकेशनदेखील ऑनलाइन करता येतं. प्राप्तिकर विभागाने (IncomeTax Department) नुकतीच एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  आता पॅनसाठी अर्ज करणं खूप सोपं झालं असून, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आहे, ते इन्स्टंट पॅन (instant Pan) किंवा ई-पॅनसाठी (E-Pan) ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 10 मिनिटांत ते मिळवू शकतात, असं प्राप्तिकर विभागाने म्हटलं आहे.

  यासाठी तुम्हाला प्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या आयकर पोर्टलवर जावं लागेल. या पोर्टलच्या होमपेजवर ‘Verify Your PAN’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तपशील विचारला जातो. यामध्ये तुम्हाला जन्मतारीख, मोबाइल क्रमांक आणि नाव भरावं लागेल. यासह पडताळणी प्रक्रिया सुरू होईल.

  ई-पॅन (e-PAN) हे डिजिटल स्वाक्षरी केलेलं पॅन कार्ड असून, त्याचा ई-केवायसी (E-KYC) डेटा आधार कार्डावर आधारित आहे. ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे, तेच ई-पॅनसाठी अर्ज करू शकतात आणि मिळवू शकतात. ई-पॅन पीडीएफ (PDF) स्वरूपात जारी केलं जातं. पॅनची ही पद्धत वेळ वाचवणारी आहे. तसंच यात प्लास्टिक किंवा कागद वापरला जात नसल्यानं ती पर्यावरणपूरक आहे.

  हे ही वाचा-Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी नियमांत बदल, UIDAI ने सांगितला नवा नियम

  ई-पॅनसाठी अर्ज करण्याकरिता मोबाइल किंवा लॅपटॉपवरून खालील प्रकारे क्रिया करा :

  - सर्वांत आधी कोणताही इंटरनेट ब्राउझर उघडावा आणि https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टलवर जावं.

  - या पोर्टलच्या होम पेजवर ई-पॅनसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावं.

  - आता एका नवीन विंडोवर ‘Get New e-PAN’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं.

  - आता एक नवीन पेज उघडेल. यात तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि जन्मतारीख ही माहिती भरण्यास सांगितलं जाईल. ही माहिती भरल्यानंतर याची पडताळणी करण्यासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.

  - यानंतर सबमिट टॅबवर क्लिक करावं.

  - आपल्या ई-पॅनचं स्टेटस बघण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी, खाली सांगितलेल्या क्रिया कराव्यात.

  - वेबसाइटच्या होमपेजवर जावं आणि ई-पॅनशी संबंधित टॅबवर क्लिक करावं.

  - त्यानंतर एका नवीन विंडोवर ‘Check Status/ Download PAN’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  - आता नवीन पेजवर तुम्हाला आधार क्रमांक भरण्यास सांगितलं जाईल. याची पडताळणी करण्यासाठी मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, त्याद्वारे तुम्ही तुमच्या पॅनचं स्टेटस सहज तपासू शकाल.

  - तुमचं ई-पॅन तयार असेल, तर तुम्ही हा दस्तऐवज डाउनलोड करू शकाल.

  First published:
  top videos

   Tags: Pan card, Pan card online