नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: बँकेच्या सर्व्हिसेस ठराविक कालावधीनंतर अपडेट केल्या जातात. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना या प्रक्रियेतून जावे लागते. अशीच प्रक्रिया Bank of India मध्ये केली जाणार आहे. त्यादरम्यान तुम्हाला बँक सेवा वापरता येणार नाहीत. जर तुम्ही देखील बँक ऑफ इंडियाचे (Alert for Bank of India Customer) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. देशातील या सरकारी बँकेच्या काही सेवा 23 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान अनेक तास बंद राहतील. बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे. बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर म्हटले आहे की, टेक्नोलॉजी अपग्रेड करण्यासाठी बँकेच्या काही सेवा बंद राहतील. ग्राहकांना निर्धारित वेळेदरम्यान पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करता येणार नाहीत. शिवाय तुम्ही फक्त निवडलेल्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकाल. वाचा- 100 GW सौरऊर्जेसाठी Reliance ची जगातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी कोणत्या वेळेत बंद राहणार बँक सेवा? बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सांगितले आहे की 23 ऑक्टोबर 2021 01:30 वाजल्यापासून (IST) ते 24 ऑक्टोबर 2021 पर्यंत 17:00 वाजेपर्यंत (IST) पर्यंत टेक्नोलॉजी अपग्रेड करण्यासाठी सिस्टम अपग्रेडेशन केले जाईल. यामुळे अनेक बँकिंग सेवा उपलब्ध होणार नाहीत.
महत्वपूर्ण सूचना! pic.twitter.com/ZBBs8eRs8u
— Bank of India (@BankofIndia_IN) October 22, 2021
या सेवा राहणार बंद या कालावधीत तुम्हाला एटीएम, यूपीआय, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग, IMPS आणि IVR द्वारे देखील बँकिंग सेवा उपलब्ध असतील. तुम्ही NEFT, RTGS, मिस्ड कॉल चौकशी आणि पासबुक / खात्याचा तपशील तयार करण्याशी संबंधित बँकिंग सेवा वापरू शकणार नाही.