मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Ration Card : स्वस्त दरातील धान्य मिळण्यास समस्या येतेय? या नंबरवर करा तक्रार

Ration Card : स्वस्त दरातील धान्य मिळण्यास समस्या येतेय? या नंबरवर करा तक्रार

दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देशभरात फ्री धान्य दिलं जात आहे. परंतु याचदरम्यान अनेक लोकांना कमी धान्य मिळत असून रेशन कार्ड डीलर ते धान्य प्रायव्हेट लोकांना विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 23 जून : सरकार गरीबांना स्वस्त धान्य उपलब्ध करुन देते. रेशन कार्डद्वारे (Ration Card) स्वस्त धान्य दिलं जातं. या कार्डमुळे कोरोनाकाळात अनेकांना याचा फायदा झाला आहे. दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PM Garib Kalyan Ann Yojana) देशभरात फ्री धान्य दिलं जात आहे. परंतु याचदरम्यान अनेक लोकांना कमी धान्य मिळत असून रेशन कार्ड डीलर ते धान्य प्रायव्हेट लोकांना विकत असल्याची माहिती समोर आली आहे. असं काही तुमच्यासोबतही झालं असल्यास किंवा यासंबंधी कोणतीही तक्रार (Ration Related Complaint Number) असल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता. सरकारने राज्यांच्या हिशेबाने टोल फ्री नंबर (Toll Free Number) जारी केले आहेत.

दिल्ली - 1800-110-841

महाराष्ट्र - 1800-22-4950

गुजरात - 1800-233-5500

गोवा - 1800-233-0022

केरळ - 1800-425-1550

कर्नाटक - 1800-425-9339

त्याशिवाय तुम्हाला एनएफएसएच्या (NFSA) वेबसाईट https://nfsa.gov.in वरुनही नंबर घेता येईल. या वेबसाईटवर तुम्ही तक्रारही दाखल करू शकता. अनेकदा रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतरही अनेकांना कित्येक महिने रेशन कार्डही मिळत नाही. अशा तक्रारीही ग्राहक करू शकतात.

कोरोनामुळे बदलला भारतीयांचा खरेदी ट्रेंड; चारमधील एका फोनची ऑनलाईन खरेदी

भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आणि अन्न वितरणासंदर्भातील त्रुटी टाळण्यासाठी शासनाने तक्रारीचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहे, जेणेकरुन अनुदानित रेशन गरिबांपर्यंत पोहोचेल. एखादा रेशन कार्ड होल्डर आपला धान्य कोटा प्राप्त करू शकत नसेल, तर तो टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करुन आपली तक्रार दाखल करू शकतात.

Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस

अनेक राज्यात रेशन कार्ड मोफत बनवून दिलं जात. तर काही राज्यात यासाठी पैसे द्यावे लागतात. रेशन कार्ड बनवण्याची फी 5 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत आहे. रेशन कार्ड प्रत्येकाचं बनत नाही, हे इन्कम आधारे ठरवलं जातं. रेशन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, फोटो, विज बील, गॅस कनेक्शन बुक, रेंटल अॅग्रीमेंट असे कागदपत्र आवश्यक असतात.

First published:
top videos

    Tags: Ration card