मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon वर 17 हजारांचा फोन 4 हजारात; अशा ऑफरमध्ये अडकू नका, असा होतोय Online Fraud

Amazon वर 17 हजारांचा फोन 4 हजारात; अशा ऑफरमध्ये अडकू नका, असा होतोय Online Fraud

अ‍ॅमेझॉनच्या नावाने फोन करुन ऑफरच्या जाळ्यात अडकवून ऑनलाईन फ्रॉड केला जात आहे.

अ‍ॅमेझॉनच्या नावाने फोन करुन ऑफरच्या जाळ्यात अडकवून ऑनलाईन फ्रॉड केला जात आहे.

अ‍ॅमेझॉनच्या नावाने फोन करुन ऑफरच्या जाळ्यात अडकवून ऑनलाईन फ्रॉड केला जात आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : वाढत्या ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) काळात हॅकर्सकडून अनेक पद्धतींचा वापर करुन लोकांची फसवणूक केली जात आहे. सध्या असाच फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरुन होणारा फ्रॉड ट्रेंडमध्ये आहे. अ‍ॅमेझॉनच्या नावाने फोन करुन ऑफरच्या जाळ्यात अडकवून ऑनलाईन फ्रॉड केला जात आहे.

नुकतीच अशाप्रकारची एक घटना समोर आली आहे. एका मुलीने अ‍ॅमेझॉनमधून बोलत असल्याचं सांगत Vivo V15 स्मार्टफोनवर 70 टक्के सूट दिली जात असल्याचं सांगितलं. अ‍ॅमेझॉनच्या या ऑफरमध्ये 17000 रुपयांचा फोन केवळ 4400 रुपयांत खरेदीची संधी असल्याचं सांगितलं गेलं. नाव आणि पत्ता कन्फर्म केल्यानंतर फोन मिळेल, असंही सांगण्यात आलं. पण कॉल आलेल्या व्यक्तीने अ‍ॅमेझॉन इतक्या स्वस्तात ऑफर देण्यामागचं कारण विचारलं. त्यावर समोरुन बोलणाऱ्या महिलेने अ‍ॅमेझॉनने लॉकडाउनमध्ये या फोनचा मोठा स्टॉक घेतल्याचं म्हटलं. परंतु फोनची विक्री होत नसल्याने कंपनीने प्रमोशन करण्यासाठी ही ऑफर लाँच केल्याचं सांगण्यात आलं.

फोन ऑफरमध्ये घेण्यासाठी नाव आणि पत्ता द्यावा लागेल. या दोन्ही गोष्टी वेरिफाय झाल्यानंतर अ‍ॅमेझॉनकडून कॉल येईल असं समोरुन कॉल करणाऱ्या महिलेने सांगितलं. हे पार्सल भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे मिळेल आणि कॅश ऑन डिलीव्हरी असेल, असंही सांगितलं.

महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे जे पार्सल येतं, ते पुन्हा परत करता येत नाही. कॅश ऑन डिलीव्हरी असल्यास, आधी पैसे देऊन नंतरच ते ओपन करावं लागतं. पार्सलमध्ये नेमकं काय असेल, याची जबाबदारी पोस्ट ऑफिसची नसते.

Facebook वरून `अशा` पद्धतीने होऊ शकते फसवणूक; सावधगिरी बाळगण्याची गरज

अ‍ॅमेझॉन स्वत: वस्तू पार्सल का करत नाही, यावरही हॅकर्सकडून उत्तर दिलं जातं. अ‍ॅमेझॉनने विवोसह टायअप केल्याने आणि प्रमोशन करण्यासाठी पोस्टद्वारे पार्सल पाठवलं जातं. फोनवर व्यक्तीला कोणतीही उत्तर देऊन त्याला जाळ्यात अडकवलं जातं.

त्यामुळे अशा कोणत्याही ऑफरच्या जाळ्यात अडकू नका. कोणतीही कंपनी अशाप्रकारे प्रमोशन करत नाही. ऑफर असल्यास कंपनी आपल्या वेबसाईट किंवा वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देते. अशाप्रकारचा कॉल तुम्हालाही आल्यास, सावध व्हा. मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कोणत्याही ऑफरच्या लिंक ओपन करू नका.

First published: