नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आता मोबाईल डेटासाठी चार्ज वाढवून असून 35 रुपये प्रती जीबी करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या दरापेक्षा सात ते आठ टक्के जास्त हे दर आहेत. याशिवाय ठराविक मासिक शुल्कासह कॉलसाठी 6 पैसे प्रती मिनीट दर करण्याची मागणीही कंपनीने केली आहे. कंपनी आर्थिक संकटात आहे. त्यांना एजीआरची थकबाकी भरायची आहे आणि यासाठी नवे दर लागू केले पाहिजेत असं कंपनीने म्हटलं आहे.
कंपनीने एजीआर थकबाकी भरण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी मागितला आहे. यासह कंपनीने म्हटलं की, त्यांना व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यासाठी सूट मिळावी अशी मागणी कंपनीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
व्होडाफोन आयडीयाची एकूण थकबाकी 53 हजार कोटी रुपये आहे. कंपनीने आतापर्यंत दूरसंचार विभागाला 3500 कोटी रुपये दिले आहेत. कंपनी सुरु ठेवण्यासाठी सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक एप्रिल 2020 पासून मोबाइल डेटा शूल्क किमान 35 रुपये प्रती एक जीबीसाठी करण्यात यावं असं म्हटलं आहे. त्यासोबत महिन्याला किमान 50 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या मागण्या मान्य होणं कठिण असून जर या मागण्या मान्य झाल्या तर ग्राहकांना दणका बसणार आहे.
रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर दूरसंचार कंपन्यांवर आधीपासूनच स्पर्धेत टिकण्याचं आव्हान आहे. त्यानंतर आता अब्जावधी डॉलर्सचं कर्ज आहे. व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि इतर दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्या सरकारला 1.4 लाख कोटी रुपये देणे बाकी आहे.
वाचा : अगदी कमी किंमतीत वापरा 3 कॅमेराचा फोन, 'या' फोनमध्ये आहेत नवे फीचर
कॉलिंग सेवा देण्यासाठी किमान 6 पैसे प्रती मिनिट दर आकारण्यात यावा. गेल्या तीन महिन्यांत आधीच 50 टक्के वाढ केली असताना या मागण्या केल्या आहेत. दर वाढवल्याने कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाचा : Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.