मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लॅपटॉप चार्ज होत नाहीये? काळजी नको; 'या' सोप्या पद्धतीनं करा घरबसल्या दुरुस्त

लॅपटॉप चार्ज होत नाहीये? काळजी नको; 'या' सोप्या पद्धतीनं करा घरबसल्या दुरुस्त

काहीवेळा लॅपटॉप चार्ज न होण्याचं कारण एकदम किरकोळ किंवा अगदी सहज दुरुस्त करण्यासारखं असतं. अशा काही सहज करता येण्यासारख्या तपासण्यांची माहिती घेऊया

काहीवेळा लॅपटॉप चार्ज न होण्याचं कारण एकदम किरकोळ किंवा अगदी सहज दुरुस्त करण्यासारखं असतं. अशा काही सहज करता येण्यासारख्या तपासण्यांची माहिती घेऊया

काहीवेळा लॅपटॉप चार्ज न होण्याचं कारण एकदम किरकोळ किंवा अगदी सहज दुरुस्त करण्यासारखं असतं. अशा काही सहज करता येण्यासारख्या तपासण्यांची माहिती घेऊया

  नवी दिल्ली 23 ऑगस्ट : काही वेळा लॅपटॉप चार्जिंगला (Laptop Charging) लावल्यानंतर लक्षात येतं, की तो चार्जच होत नाहीये. चार्जिंगचं नोटिफिकेशन (Charging Notification) येत नाही. तसंच, टास्कबारवरचा बॅटरीचा आयकॉनही बॅटरी चार्ज होत असल्याचं दाखवत नाही. असं दिसलं की एकदम टेन्शन येतं. नेमकं काय करायचं ते कळत नाही. सहाजिकच आहे. कारण काही तरी मोठीच समस्या निर्माण झाली असावी, अशी भीती मनात निर्माण होते. पण वास्तविक प्रत्येकवेळी तसंच काही झालं असेल असं नाही. काहीवेळा लॅपटॉप चार्ज न होण्याचं कारण एकदम किरकोळ किंवा अगदी सहज दुरुस्त करण्यासारखं असतं. अशा काही सहज करता येण्यासारख्या तपासण्यांची माहिती घेऊया, जेणेकरून या प्राथमिक तपासण्या तुम्ही लगेचच्या लगेच करू शकाल आणि कदाचित तुमची समस्या लगेच सोडवलीही जाऊ शकेल.

  Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, घरी पोहोचेल PVC कार्ड;जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस

  - सर्व केबल कनेक्शन्स तपासावीत

  - लॅपटॉप चार्ज होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर ट्रबलशूटिंग (Troubleshooting) करण्यापूर्वी सर्व केबल कनेक्शन्स व्यवस्थित आहेत ना, हे एकदा पाहावं. प्लगमध्ये पिन व्यवस्थित बसली आहे ना, तसंच लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टमध्ये केबल व्यवस्थित बसली आहे ना, हे तपासावं. एकदा प्लग बदलून दुसऱ्या प्लगमध्ये पिन घालून पाहावी. तुम्ही इलेक्ट्रिक एक्स्टेंशन बोर्डवरून लॅपटॉप चार्जरसाठी कनेक्शन घेतलं असेल, तर एकदा थेट मुख्य बोर्डवरच्या प्लगमध्ये पिन लावून पाहावी. तसंच AC Adapter चं कनेक्शनही व्यवस्थित आहे ना, हे तपासावं.

  - बॅटरी काढून पाहणं

  - ज्या लॅपटॉप्सना रिमूव्हेबल (Removable Battery) अर्थात काढता येण्यासारखी बॅटरी असेल त्यांच्यासाठी हा पर्याय लागू आहे. लॅपटॉप शट डाउन करावा, चार्जरची पिन प्लगमधून काढावी आणि लॅपटॉपला जोडलेली केबलही काढावी. त्यानंतर बॅटरी बाहेर काढावी. त्यानंतर काही वेळ पॉवर बटण दाबून ठेवावं, जेणेकरून सिस्टीममध्ये थोडी ऊर्जा शिल्लक राहिली असली, तर ती वापरली जाईल. त्यानंतर लॅपटॉपला चार्जर जोडावा आणि लॅपटॉप ऑन करण्याचा प्रयत्न करावा. लॅपटॉप योग्य प्रकारे सुरू झाला, तर चार्जिंगची समस्या बॅटरीत आहे असा प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. बॅटरी पुन्हा लॅपटॉपमध्ये बसवण्याआधी बॅटरी कम्पार्टमेंट स्वच्छ करावा. त्यानंतर बॅटरी योग्य प्रकारे बसवावी. यानंतर लॅपटॉप योग्य प्रकारे सुरू झाला नाही, तर लॅपटॉपची बॅटरी डेड झाली असल्याची शक्यता आहे. तसं असेल तर ती बदलून घेण्याची आवश्यकता आहे.

  Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Googleकडूनही बॅन; 4500 युजर्सला आर्थिक फटका

  - योग्य चार्जर आणि पोर्ट्सचा वापर

  - लॅपटॉपच्या बॅटरीला पुरेशी ऊर्जा मिळतेय की नाही, हेही तपासावं लागतं. सर्वसाधारणतः लॅपटॉपला चार्जिंगसाठी एकच पोर्ट असतो; मात्र अलीकडे नव्या लॅपटॉप्सना USB-C चार्जर्सद्वारे चार्ज करणंही शक्य असतं. हे चार्जर्स USB-C पोर्टला कनेक्ट करावे लागतात. लॅपटॉपला असलेल्या सर्व USB-C पोर्ट्स पुरेसं ऊर्जा व्यवस्थापन करू शकतातच, असं नाही. त्यामुळे दुसऱ्या USB-C पोर्टला चार्जर कनेक्ट करून पाहावा. काहीवेळा काही USB-C पोर्ट्स केवळ डेटा ट्रान्स्फरसाठीच वापरण्यासाठी राखीव असू शकतात. त्याशिवाय, नेहमी ओरिजिनल चार्जरच वापरावा. अन्य कोणता चार्जर वापरल्यास लॅपटॉप चार्जिंगला वेळ लागू शकतो.

  - केबल आणि पोर्ट सुस्थितीत आहे ना, याची तपासणी

  - चार्जरची पॉवर कॉर्ड/केबल आणि पोर्ट सुस्थितीत आहे ना, याची एकदा तपासणी करावी. चार्जर लावल्यानंतर खूपच गरम होत असेल किंवा जळल्यासारखा वास येत असेल, तर असा चार्जर वापरू नये.

  First published:
  top videos

   Tags: Technics